नाबाद 100... बिस्किट बनविणा-या 'ब्रिटानिया' कंपनीबाबत काही रंजक बाबी!

नाबाद 100... बिस्किट बनविणा-या 'ब्रिटानिया' कंपनीबाबत काही रंजक बाबी!

वेळ कोणतीही असो आपली भूक क्षमविण्यासाठी आपण बिस्किटांचा आधार घेतो. छोटे, तरुण किंवा मोठी माणसं कोणालाही बिस्किटांचा मोह आवरला नाही. त्यात 'ब्रिटानिया'ची बिस्किटं म्हणजे काय तर सोने पे सुहागा... बिस्किट, केकसारख्या बेकरी खाद्यपदार्थांमध्ये पारंगत असणा-या 'ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमिटेड' या कंपनीने आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत. म्हणून आज आपण पाहू यात या कंपनीबाबत काही रंजक बाबी!

सुरुवात... पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात 1892 साली 'ब्रिटानिया' नावाअंतर्गत छोट्याश्या घरात बिस्किट बनविण्यास सुरुवात केली. फक्त 265 रुपयांचे भांडवल उभे करुन बिस्किट बनविण्यास सुरुवात केली. 1918 साली ब्रिटनियाचे 'ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमिटेड'मध्ये रुपांतर झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीने मागे वळून पाहिले नाही. 


वाडियांची जादू... 1980 पर्यंत ब्रिटानिया कंपनीमध्ये केरळ बिझनेसमन राजन पिल्लई यांचे सर्वाधिक शेअर्स होते. म्हणूनच त्यांना 'बिस्किट राजा' असे संबोधले जायचे. त्यानंतर 1993 साली सुप्रसिद्ध बिझनेस कुटुंब 'वाडिया ग्रुप'ने ब्रिटानिया कंपनीचे अधिकांश शेअर्स खरेदी केले. तेव्हापासून आतापर्यंत ब्रिटानियावर 'वाडिया ग्रुप'चे वर्चस्व आहे.

कोण आहेत कंपनीचे चेअरमन... 'ब्रिटानिया' कंपनीचे चेअरमन नस्ली एन. वाडिया असून कपिल चोहान कंपनीतील वरिष्ठांपैकी एक आहेत.


ब्रिटनियाची उत्पादन... कंपनीने सुरुवात बिस्किट बनविण्यापासून केली त्यानंतर ब्रेड, रस्क, केक्स आणि डेअरी उत्पादनांचे निर्माण कंपनीने केले. बिस्किटांमध्ये गूडडे, विटामेरीगोल्ड, टाइगर, न्यूट्रिचॉइस, 50 50, ट्रीट, मिल्क बीकिस, बोरबॉन, नाइस आणि लिटिल हर्ट्स ही ब्रिटानियाची सर्वोत्तम आणि सर्वाधिक खपणारी बिस्किट आहेत.

कंपनीची वाढ आणि नफा... 1998 ते 2001 दरम्यान कंपनीची वाढ 16 टक्क्यांनी झाली. तर ऑपरेटिंग नफा 18 टक्के एवढा होता. कंपनीच्या वर्षाच्या रेवेन्यू पैकी 160 कोटींहून अधिक रक्कम फक्त बिस्टिकांमधूनच येत होता. म्हणूनच ब्रिटानियाचे नाव सर्वात विश्वसनीय ब्रँडच्या यादीत घेतले जात असत.


ब्रिटानियाचा नफा... 2017 मध्ये ब्रिटानिया कंपनीचा रेव्हेन्यू 8,684.39 कोटी रुपये एवढा होता. याचवर्षी कंपनीने 843.69 कोटी रुपये नफा कमविला. तर 3,206 कर्मचारी कंपनीत कार्यरत आहेत. येत्या 12 महिन्यात कंपनी 50 नवे प्रॉडक्ट्स आणणार असल्याची घोषणा कंपनी व्यवस्थापनाने केली आहे.