Money Management - पैसे बचत करण्याचे प्रभावी मार्ग...

Money Management - पैसे बचत करण्याचे प्रभावी मार्ग...

आयुष्यात मनी मॅनेजमेंट महत्त्वाचे असते. आपल्या कधी, केव्हा, कुठे आणि किती पैशांची गरज लागेल हे सांगता येत नाही. यासाठीच मनी मॅनेजमेंट करणे महत्त्वाचे असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स घेऊन आलो आहोत. पाहू यात कोणत्या आहेत या टीप्स... 

तारुण्यातच पैसे बचत करण्याची सवय लावा... साधारणतः (१८-२५) वयोगटातील मुलं-मुली वाम मार्गाला लागतात. त्यांना तेव्हाच पैशांचे महत्त्व कळायला हवे. "आज मजा करु आणि म्हातारपणी पैशांची बचत करुयात", असे तरुणांचे मत असते. परंतु पैसे बचतीची सवय तुम्ही तेव्हाच नाही निर्माण केली तर वृद्धापकाळातही तुम्ही पैसे बचत करू शकणार नाही. तसेच तारुण्यपणी बचत केल्यावर उतारवयापर्यंत तुमच्या बक्कळ पैसे जमतील.


२० रुपये बचत करण्याचा प्रयत्न करा... तुम्हाला जेव्हा केव्हा २० रुपयांची नोट मिळाली, ती एका पाकिटात ठेवा आणि ते पाकिट लपवून ठेवा. अशाप्रकारे ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोट बचत करण्यावर भर द्या.

FD, RD, SIP किंवा LIC चा सहारा घ्या... पैसे बचतीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे. अशात-हेने आपल्या बॅंक खात्यातून महिन्याच्या विशिष्ट तारखेला पैसे जातात आणि आपल्या नकळतच गुंतवणूक होते राहते.


तुमच्या खर्चाचे मुल्यांकन करा... तुमच्या महिनाभरातील खर्चांची यादीमध्ये नोंद करा. त्यानुसार तुम्हाला कळेल की, आपले कुठे पैसे खर्च होतात. ते तात्काळ थांबवा. गरजेपुरताच खर्च करा अशाने तुमचे पैसे नक्की बचत होतील.