मार्क झुकरबर्गने तरुण बिझनेसमन्सला दिलेले यशाचे मंत्र!

मार्क झुकरबर्गने तरुण बिझनेसमन्सला दिलेले यशाचे मंत्र!

फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गकडे आपण तरुण यशस्वी उद्योजक म्हणून पाहतो. मोठे विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण न घेता त्याने फेसबूकचे स्वप्न पाहिले. पहिले लोकांना त्यावर बोलवून आणि आता त्यातून अमाप रेव्हेन्यू कमविण्याचे मॉडेल मार्कने फेसबूकला बनविले आहे. फेसबूक आणि मार्कच्या यशात काही बाबींचा मोठा वाटा आहे. त्याशिवाय मार्क कधीच पुढे नसता गेला. असेच काही यशाचे मंत्र त्याने एका विद्यापीठाच्या मुलांसोबत मांडले. पाहू यात मार्क झुकरबर्गने तरुण बिझनेसमन्स दिलेले यशाचे मंत्र...


१. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा... मार्क सांगतो, आपण सर्वांनी स्वप्नं पाहिली पाहिजेत. तसेच ते सत्यात उतरविण्यासाठी त्यांना पाठलागही केला पाहिजे. या मार्गात अनेक अडथळे येतील, त्यावर मात करुन आपण आपले ध्येय साध्य केले पाहिजे.


२. महत्त्वाकांक्षी व्हा जेव्हा फेसबुक हे फक्त साधं प्रोजेक्ट होतं तेव्हा मार्क हे प्रोजेक्ट विकून साधारण पैसे कमवू शकला असता; परंतु मार्क महत्त्वाकांक्षी तरुण आहे. त्याने फेसबुकला मोठं करायचा विचार केला आणि आज फेसबूकने सर्व जग बदललं आहे. म्हणूनच जीवनात महत्त्वाकांक्षी होण्याचा सल्ला मार्कने दिला.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


३. छोटं-छोटी पाऊले टाका... कधी-कधी मोठं ध्येय साध्य न झाल्यास आपण हताश होतो. म्हणूनच मार्क सांगतो, छोटं-छोटी पाऊले टाका. छोटी ध्येय ठेवा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अशाने आपल्याला काम पूर्ण करण्याची, यशाची सवय लागेल. यानंतर तुम्ही मोठी ध्येयं ठेवा.


४. स्वतःवर विश्वास ठेवा... सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही काय करताय, तुम्हाला जीवनात काय करायचं आहे, यावर विश्वास ठेवा. तुमच्यातील प्रतिभा, कौशल्यं ओळखा आणि त्यानूसार कामाला लागा.


५. तुमची आवड ओळखा... मार्क झुकरबर्गला सुरुवातीपासून कंप्युटर प्रोग्रॅमिंगची आवड होती. त्याने पुढे हीच आवड आपल्या कामात, त्यानंतर बिझनेसमध्ये बदलली. याच आवडीमुळे तो जगातील सर्वात तरुण श्रीमंत माणूस आहे. म्हणून तुमची आवड ओळखा आणि आवडेल तेच करा.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


६. मेहनती व्हा... जर तुम्हाला मार्कसारखं यशस्वी आणि श्रीमंत व्हायचं असेल तर मेहनत करा. मार्कने स्वतः फेसबुक निर्माण करण्यासाठी रात्र-रात्र जागली आहे. म्हणून तरुण बिझनेसमन्ससाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे मेहनतीशिवाय पर्याय नाही.


७. दबावापुढे झुकू नका... जेव्हा मार्कला फेसबूकची वेबसाईट सुरु करायची होते तेव्हा गूगल वर्ल्ड वाईड वेबचा राजा होता; परंतु मार्क त्यांच्यासमोर झुकला नाही. छोट्या-मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊन मार्कने फेसबूक सुरु केलेच. आपलही कंपनी टेक-ओव्हर करायला अनेकजन येतील, दबाव देतील; पण दबावापुढे झुकू नका, असे मार्क तरुण बिझनेसमन्सला सांगतो.


स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 


८. जोखीम घ्या... मार्क झुकरबर्ग सांगतो, जीवनात रिस्क घ्या, त्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. अयशस्वी किंवा नापास झालो तरीही त्या गोष्टीचे वाईट वाटू घेऊ नका. पुन्हा प्रयत्न करा आणि भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ.