बिझनेस जगतातील तुम्हाला माहीत नसलेल्या रंजक बाबी...

बिझनेस जगतातील तुम्हाला माहीत नसलेल्या रंजक बाबी...

बिझनेस म्हणजे पैशांचा खेळ... एवढा सेल झालाच पाहिजे... मार्केटिंग टीमचे लुभावणारे आकडे... नफा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसं... अशी काही बिझनेसची संज्ञा आपल्या डोक्यात घर करुन बसली आहे; परंतु बिझनेसमध्येही काही घडामोडी घडतात, त्या रंजक असून आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. म्हणूनच 'स्नेहलनीती' तुमच्यासाठी बिझनेस जगतातील काही रंजक गोष्टी घेऊन आली आहे.

कोका-कोला लोगोबद्दल... कोका-कोला या शितपेयाचा लाल आणि पांढ-या रंगाचा असलेला लोगो जगातील ९४ टक्के लोकं ओळखू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोका-कोला लोकांवर पोहोचला आहे.


अॅपलचे प्रोडक्ट्स सॅमसंग कंपनी बनवते... अॅपलचे आणि सॅमसंग कंपन्यांमधील ठस्सन संपूर्ण जगाला सर्वश्रुत आहे; परंतु तुम्हाला माहीत आहे का अॅपलचे आयपॅडचा रेटिना डिसप्ले सॅमसंग कंपनी बनवते.

ग्राहकच सर्वश्रेष्ठ आहे... अमेझॉन कंपनीचे सर्व कर्मचारी वर्षातील दोन दिवस ग्राहक सेवेसंबंधी काम करतात. ते कोणत्याही फिल्डचे असो, कर्मचारी हे काम करतातच. कंपनीचे सीईओसुद्धा यास अपवाद नाहीत.


'याहू' म्हणजे काय... सर्वात मोठी कंपनी असलेल्या 'याहू'चे पूर्ण नाव “Yet Another Hierarchical Officious Oracle" असे आहे.

शेअर्स विकण्याची घाई करु नका... अॅपल ही कंपनी स्टीव्ह जॉब्स यांनी स्टीव्ह वॉझनियाक आणि रोनल्ड वेन या मित्रांसोबत सुरु केली. दरम्यान रोनल्ड वेन यांनी आपले शेअर्स १२ दिवसातच ८०० अमेरिकन डॉलरला विकले. आज त्याच शेअर्सची मार्केट व्हॅल्यू ३५ अमेरिकन बिलियन डॉलर आहे.


सॅमसंगचे वेगळे उद्योग... सॅमसंगही कंपनी मोबाईल तयार करते, हे आपल्याला माहीत आहे. त्यासोबत ही कंपनी शस्त्रास्त्रे बनवणे, जीवन वीमा आणि थीम पार्क मॅनेजमेंटमध्येही कार्यरत आहे.

'फेडएक्स'ने जुगारातून कंपनीचा रेव्हेन्यू उभारला... १९७४ साली 'फेडएक्स' ही दिवाळखोरीच्या दिशेने जात होती. तेव्हा कंपनीच्या फाऊंडरनी कंपनीच्या मालमत्तेमधील ५ हजार अमेरिकन डॉलरचा सट्टा खेळला. त्यातून त्यांनी ३२ हजार अमेरिकन डॉलर जिंकले आणि कंपनीसाठी रेव्हेन्यू तयार केला. आज 'फेडएक्स' कंपनीची मार्केट व्हॅल्यू ३० बिलियन अमेरिकन डॉलर आहे.