झिरो इन्वेस्टमेंट १०० टक्के प्रॉफिट असा बिझनेस...

झिरो इन्वेस्टमेंट १०० टक्के प्रॉफिट असा बिझनेस...

साधारण २०१० मध्ये 'बॅण्ड, बाजा बारात' हा  हिंदी चित्रपट आला होता. रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा हे कलाकार असलेल्या या चित्रपटात वेडिंग प्लॅनर असा नवा विषय मांडण्यात आला होता. तेव्हापासूनच साध्या लग्नाचे बॅण्ड, बाजा आणि लग्नाचा बिझनेस मध्ये रुपांतर झाले. गल्लीतले साधं लग्न असो वा विराट वअनुष्काचे डेस्टिनेशन वेडिंग... लग्नाचा बिझनेस जबरदस्त वाढत आहे. भारतात लग्नावर लाखो-करोडे पैसे करणारी मंडळी आहेत. तसेच सिझनल काम आणि १०० टक्के प्रोफिटमुळे अनेक लोक या व्यवसायातउतरली आहेत. तर आज आपण पाहू यात इंडियन वेडिंग इंडस्ट्रीमधील बिझनेस स्कोप...


सध्या धकाधकीच्या जीवनात सर्व वस्तू आपल्याला हातात हव्या असतात आणि त्यासाठी आपण कितीही पैसे मोजू शकतो. आजच्या लग्न कार्याचेही असेच आहे. हॉल, जेवण, पाहुण्यांची सोय, लग्नातील विधीपासून ते वधू-वराच्या गळ्यातील हार पुरवण्याचे काम वेडिंग प्लॅनर करतात. आपण फक्त घरातून हॉलपर्यंत यायचे कष्ट करायचे आणि कार्यक्रम एन्जॉय करायचा.


वेडिंग प्लॅनरकडे आपल्या बजेटप्रमाणे लग्नाचा प्लॅन असतो. म्हणजे काही लाखांपासून  ते करोडो रुपयांचे बजेट, साध्या सभागृहापासून ते भारतात किंवा फॉरेन डेस्टिनेशन वेडिंग, असे अनेक पर्याय ही लोकं ग्राहकांना देतात. बरं हा वेंडिंग प्लॅनर सर्वांना कामाला लावतो आणि स्वतः मात्र काम चोखंदळ आणि सर्वोत्तम होते की नाही यावर देखरेखकरतो. उदाहरणः कॅटेरिंगवाल्याला जेवणाची ऑर्डर फुलवाल्यांना हार आणि सजावटीची ऑर्डर इ.

परंतु, ही सारी कसरत वाटते तेवढी सोपी नाही. वेडिंग प्लॅनर सर्व गोष्टींची खात्रीशीर करावयाच्या असतात. नाही तर एक चूक त्यांचे मार्केटमधील नाव संपवू शकते आणि बिझनेसठप्प...


360-Degree solutions... वेडिंग प्लॅनर यांनी सध्या 360-Degree solutions वर भर दिला आहे. लग्न समारंभामध्ये लागणा-या सर्व गोष्टींची पूर्तता या 360-Degreeमध्ये करतात. उदा. फोटोग्राफी, डान्स, डीजे, वधू-वरांचे कपडे कसे असावे इ. येथे एक किस्सा सांगावासा वाटतो, “मित्राचं लग्न होतं. त्याला जग्वारमधून लग्न सभागृहात इंट्री मारायची होती. तेव्हा त्याने वेडिंग प्लॅनरकडे फर्माईश केली. वेडींग प्लॅनरने काही तासात रेंटवरील जग्वार दारात उभी केली.” दरम्यान, इव्हेंट एन्जॉएबल कसा होईल, यावर प्लॅनरचा भर असतो.

वेडिंग प्लॅनरची कार्यपद्धती…

· वेंडिंग प्लॅनर बनण्यासाठी तुमचे नेटवर्क जबरदस्त असणे गरजेचे आहे

· जर हॉल, डीलर किंवा कॅटेररकडून काम होत नसेल तर तुमच्याकडे दोन-तीन ऑप्शन हवेत

· वेडिंग प्लॅनर सुरुवातीला काही काही पैसे ग्राहकाकडून घेतात आणि ते नॉन-रिफंडेबल असतात

· एव्हेंटच्या आधी ५०-७५ टक्के आणि एव्हेंटदिवशी २५ टक्के, अशाप्रकारे पैसे घेतात

· तर काही वेडिंग प्लॅनर १०० टक्के ऍडव्हान्स्ड घेतात

·  वेडिंग प्लॅनरचा सर्वाधिक व्यवसाय क्रेडिटवर चालतो

एका वेडिंग मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ भरत कनोडिया सांगतात की, भारताच्या वेडिंग मार्केटमध्ये दरवर्षाला ७५ बिलियन अमेरिकन डॉलरची उलता पालथ होते. आणिही इंडस्ट्री दरवर्षाला २५-३० टक्के वाढत राहणार आहे.


१०० टक्के प्रॉफिटचा बिझनेस… हा असा एक बिझनेस आहे कारण जगात लग्न तर होतच राहणार. त्यामुळे हा बिझनेस कधीही आऊट डेटेड होणार नाही पण अपडेट नक्कीच होईल. तसेच या बिझनेसला आपण १०० टक्के प्रॉफ्रिटवाला बिझनेस असे आपण बोलू शकतो.

दरम्यान, अनेक मराठी उद्योजक मला सेमिनारमध्ये किंवा सोशल मीडियावर बिझनेस कोणता करू, असा प्रश्न विचारतात. अशावेळेस इंडियन वेडिंग इंडस्ट्रीतीलबिझनेस स्कोप आपले आयडियल उत्तर ठरू शकते.