बिझनेसमन मुकेश अंबानींबाबत कुणालाच ठाऊक नाही अशा गोष्टी…

बिझनेसमन मुकेश अंबानींबाबत कुणालाच ठाऊक नाही अशा गोष्टी…

आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ची 41 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचे मुख्य आकर्षण होते रिलायन्सचे प्रोडक्ट जिओचा विस्तार... कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर मुकेश अंबानींनी यावेळी ब्रॉडबॅन्ड सर्व्हिस 'जिओगिगाफायबर' आणि 'जिओफोन 2' या दोन सेवा सुरु केल्याचे सांगितले. लवकरच या सेवा ग्राहकांसाठी खुल्या केल्या जातील असेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात...

मुकेश अंबानी यांचे नाव जगातील नामी बिझनेसमध्ये घेतले जाते. वडील बिझनेसमन धिरुभाई अंबानी यांनी सुरु केलेला टेक्सटाईल आणि पेट्र्रोकेमिकल्सच्या बिझनेसमध्ये मुकेश तरुण वयातच रस घेऊ लागले. पुढे मुकेश यांनी रिलायन्स क्म्युनिकेशनद्वारे देशात डिजीटल क्रांती घडवली.


मुकेश अंबानींचा जन्म… रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा जन्म भारतात झालेला नाही. मुकेश यांचा जन्म आखाती देश येमेनमध्ये झाला. मुकेश अंबानी हे अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेत होते; परंतु वडील धिरुभाई अंबानी यांना बिझनेसमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. मुकेश अंबांनी यांनी २०१६ मध्ये लाईफ हा मोबाईल ब्रॅंड लॉन्च केला. हा ब्रॅंड कमी वेळेत लार्जेस्ट मोबाईल सेलिंग ब्रॅंड म्हणून नावारुपाला आला.


नेट वर्थ… उद्योजक मुकेश अंबानी यांची नेट वर्थ ४० बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. याचीच किंमत भारतीय रुपयांमध्ये २ लाख कोटी रुपये एवढी होते. फॅमिली बिझनेसमध्ये येण्याअगोदर मुकेश अंबानी यांना शिक्षक बनायचं होतं; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते फॅमिली बिझनेसमध्ये आले.


मुकेश अंबानी यांची गाडी… उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडे १.६ मिलीयन डॉलरची बीएमडबल्यू ७६०आय ही गाडी आहे. ही गाडी जर्मन बनावटीची आहे. ही गाडी बुलेटप्रुफ असून कोणताही अतिरेकी हल्ला या गाडीवर झाला तरी मुकेश यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.


५ टक्के टॅक्स रेव्हेन्यू रिलायन्सकडून येतो... देशातील ५ टक्के टॅक्स रेव्हेन्यू मुकेश अंबानी यांच्या कंपनीतून येतो. सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीतही त्यांचा पहिल्या १० मध्ये क्रमांक येतो. मुकेश अंबांनी आपल्या आहारात फक्त शाकाहारी पदार्थ घेतात. ते स्ट्रिक्टली वेजिटेरियन आहेत.


सर्वात महागडे घर… उद्योजक मुकेश अंबानी मुंबईतील सर्वात महागड्या घरात राहतात. काही वर्षांपूर्वीच मुकेश यांनी ऍंटिला हा महल बांधला. या महलाची किंमत १ बिलियन डॉलर इतकी आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांनी पत्नी निता अंबानी यांच्या बर्थडे ला प्राव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले. या प्राव्हेट जेट किंमत ६२ मिलियन डॉलर इतकी आहे.