वडील कर्जबाजारी पण मुलाने उभी केली जेट एअरवेझ कंपनी...

वडील कर्जबाजारी पण मुलाने उभी केली जेट एअरवेझ कंपनी...

आपल्या जीवनात थोडं काही वाईट प्रसंग आले किंवा आपल्या मनाविरुद्ध झाले की, आपण दुखी होतो किंवा आपल्या पराभवाचे खापर दुस-यांवर फोडतो. असे न करता आपले काय चुकले ते पहा म्हणजेच सिंहावलोकन करा आणि आपल्या पराभवावर मात करा. मित्रांनो बिझनेसचेही तसेच लॉस झाला किंवा धंदा नाही झाला तर हार मानू नका. कुठे चुकले ते पहा. प्रेरणा घ्या आणि प्रवास पूर्ण करा. यावरच भाष्य करणारी एक संघर्षात्मक आणि प्रेरणादायी कहानी स्नेहलनीती मराठी वाचकांसाठी घेऊन आली आहे. तर आढावा घेऊयात जेट एअरवेझचे फाऊंडर आणि चेअरमन नरेश गोयल यांचा कार्याचा…


सुरुवात... पंजाब राज्यातील संगूर येथे २९ जुलै १९४९ साली नरेश यांचा जन्म झाला. नरेश यांचे वडील सोनार होते; परंतु नरेश ११ वर्षाचे असताता त्यांनी जग सोडले व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे घरावर कर्जाचा डोंगर साचला होता. त्यामुळे राहते घरही त्यांना विकावे लागले. अशातच नरेश यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे होते परंतु त्यांना बी'कॉमवरच समाधान मानावे लागले.


बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


आंतरराष्ट्रीय एअरवेज कंपन्यांमध्ये काम... पुढे मामाच्या ओळखीच्या ट्रॅव्हल एजन्सीसोबत काम करण्यास सुरुवात केली. तेथे ते लेबनीझ एयरलाइन्ससोबत काम करीत असत. पुढच्या काही वर्षात इराक एअरवेज, रॉयल जॉर्डन एअरवेज, मिडल ईस्टर्न एअरलाईन अशा आंतरराष्ट्रीय एअरलाईन कंपन्यांसोबत विविधपदावर काम केले.


भारतात अद्यावत एअरलाईन तयार व्हावी... आंतरराष्ट्रीय एअरलाईन कंपन्यांमध्ये कार्यरत असताना नरेश यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय एअरलाईन कशाप्रकारे कार्य करतात, हे कळाले. आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सची सर्व्हिस, गुणवत्त्वेवर आणि ग्राहक सेवेसाठी असलेले तत्परता त्यांना भावली. अशी एअरलाईन भारतातही असावी असे त्यांना वाटले. तेव्हापासून नरेश यांना एक एअरलाईन कंपनी सुरु करण्याची खूण गाठ बांधली.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


'ओपन स्काय' धोरण आणि 'जेट'चे उड्डाण... दरम्यान १९९१ साली भारत सरकारने 'ओपन स्काय' धोरण अवलंबले आणि हीच वेळ साधून नरेश गोयल यांनी जेट एअरवेजचे डोमेस्टिक सर्व्हिस सुरु केली. उत्तम सेवा, चांगली विमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमानांचा नियमीतपणामुळे असंख्य प्रवाशांना जेट कंपनीची सेवा आवडू लागली आणि अल्पावधीत कंपनीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली.


कोटी रुपयांचे नुकसान... अनेक एअरलाईन कंपन्या असूनसुद्धा जेटच्या सर्व्हिसमुळे कंपनीला अच्छे दिन आले. परंतु बिझनेस आणि जीवनात सर्व दिवस सारखे नसतात. २०१४ साली जेटला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यातूनही भरारी घेत जेटने 'एअर सहारा' ५०० मिलीयन अमेरिकन डॉलरला विकत घेतले. सध्या कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर १४ बिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे.


स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 


११९ विमानं ६६ ठिकाणी दररोज फिरतात... जेटच्या ताफ्यात अनेक प्रकारची ११९ विमानं आहेत. ही विमान भारत आणि विदेशातील ६६ ठिकाणी दररोज उड्डाण करतात. कंपनीची कर्मचारी संख्या १६ हजाराहून अधिक आहे. अशात-हेने नरेश गोएल एक साधारण कर्जबाजारी मुलगा ते एका जगविख्यात एअरलाईन कंपनीचा मालक झाला. एवढचं नाही आज जगातील सर्वोत्तम बिझनेसमनच्या यादी त्यांचे नाव घेतले जाते.