मसाल्यांचे बादशाह असलेले  एमडीएच मसाल्यांची प्रेरणादायी कथा!

मसाल्यांचे बादशाह असलेले एमडीएच मसाल्यांची प्रेरणादायी कथा!

"असली मसाले सच सच MDH एमडीएच!" ही टॅगलाईन आपल्या डोक्यात अनेक वर्षांपासून घर करून बसली आहे. आपण किंवा घरातील गृहीणी मसाला आणायला बाजारात गेली की, आपण MDH ब्रॅन्डचेच मसाले विकत घेतो. MDH या मसाल्यांच्या कंपनीचे पूर्ण नाव 'महाशियन' दी हट्टी' असे असून मिश्यांना पिळ देणारे आणि डोक्यावर फेटा असलेले वयोवृद्ध गृहस्थ महाशय धरम पाल गुलाटी हे एमडीएच मसाल्यांच्या कंपनीचे युनिक सेलिंग पॉईन्ट राहिले. तर आज पाहूयात MDH कंपनीची यशस्वी आणि प्रेरणादायी कथा. 

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

सुरूवात… साधारण ९९ वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली महाशय चुन्नी लाल गुलाटी यांनी पाकिस्तानमधील सियालकोट येथे 'महाशियन दी हट्टी' म्हणजेच एमडीएच या मसाल्यांचे उत्पादन करणे आणि सर्वत्र विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा सुरू केलेले छोटा मसाल्याचा व्यवसाय जगभरातील १०० देशांमध्ये जाईल याची त्यांना तेव्हा कल्पना नव्हती; परंतु त्यांनी आपले मसाले विकत घ्यावे यासाठी अपार मेहनत घेतली. अशातच १९२३ चुन्नी लाल यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याचे नाव त्यांनी महाशय धरम पाल गुलाटी असे ठेवले.

Click here to watch latest motivational videos 

फाळणी आणि बिझनेसमध्ये वाढ... दरम्यान, तो काळ म्हणजे भारत पारतंत्र्यात होता. शेकडो वर्षे गुलामीत राहून अत्याचार सहन केल्याचा बिमोड होऊ लागला होता. देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळेल, असे दिसत होते. तेव्हाच इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी केली. लाखो-करोडो लोक भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून भारतात आली. त्यामधील एक गुलाटी कुटुंबीय. पाकिस्तान येथून आल्यावर महाशय धरम पाल गुलाटी हे दिल्ली येथे स्थायिक झाले. काही काळ त्यांनी टांगा चालवून आपला उदरनिर्वाह केला. त्यानंतर ते करोल बाग येथे आपल्या वडिलांचा मसाल्यांचा व्यवसायात आले आणि तो व्यवसाय करू लागले.  १९५९ साली किर्ती नगर येथे मसाल्याची मोठी फॅक्टरी उघडली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

१०० हून देशात मसाले निर्यात... तेव्हापासून ते आतापर्यंत MDH आणि महाशय धरम पाल गुलाटी यांनी मागे वळून पाहिले नाही. एमडीएच कंपनीने ६० दर्जेदार उत्पादन सुरू केले आहेत. ही उत्पादन १०० हून अधिक देशात निर्यात करतात. केरळ, कर्नाटक आणि देशातील अनेक भागांतून मसाल्याचे पदार्थ आणतात आणि उत्तम प्रकारचा मसाला बनवून ते सर्वत्र विकतात. इराण आणि अफगाणिस्तान येथेही ते मसाले निर्यात करतात, असे कंपनीचे कर्मचारी अभिमानाने सांगतात. देगी मिर्च, चाट मसाला आणि चना मसाला ही त्यांनी सर्वोत्तम खपणारी उत्पादने आहेत.

मेहनत आणि आपल्या प्रोडक्टवरील विश्वास… प्रथम पाकिस्तान नंतर संपूर्ण भारत आणि जगातील १०० हून अधिक देश असा, एमडीचचा बिझनेस विस्तारला आहे. या प्रवासात महाशय धरम पाल गुलाटी अपार मेहनत आणि आपल्या मसाल्यांच्या उत्पादनावर विश्वास ठेवला. आपले उत्पादन लोकांच्या उपयोगी येत असेल तर तुमचा बिझनेस नक्कीच चालणार, असे ते आपल्या कर्मचा-यांना सांगतात. २०१९ साली म्हणजेच पुढच्यावर्षी ‘एमडीएच’ला १०० वर्ष पूर्ण होतील. यापूर्वी  कंपनीने ९२४ कोटींचा रेव्हेन्यू जनरेट केला तर कंपनीचा नेट इन्कम २१३ कोटी रुपये एवढा आहे. अशाप्रकारे एमडीएचने आपला व्यवसाय जगभर केला आहे.