वालचंद हिराचंद: भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार !

वालचंद हिराचंद: भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार !


वालचंद हिराचंद दोशी.. यांना आज न ओळखणारे शोधून सापडणार नाहीत. आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक म्हणजे वालचंद हिराचंद. यांच्या नावावर भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना असून भारतात आधुनिक औद्योगिकीकरणाला त्यांच्यापासून सुरुवात झाली. त्यांच्यामुळे भारतात अनेक मोठमोठ्या व्यवसायांना, उद्योगधंद्यांना सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचे कितीही आभार मानले तरीही ते अपुरेच पडेल.. वालचंद हिराचंद यांनी आधुनिक आद्योगिकीकरण म्हणजे नक्की असे काय केले ज्यामुळे संपूर्ण भारताला त्यांचा अभिमान वाटतो हे जाणून घेऊया..


वालचंद यांचा जन्म... 
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा बिझनेसकडे अधिक असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व पूर्ण केले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे टाकून त्यांनी ही कामगिरी केली..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


मोठी कामगिरी... 
मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांची कामगिरी दाखवली. ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते. पण त्यांनी याचाही निर्भीडपणे सामना केला. जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. 'बॉम्बे सायकल अँड मोटार' ही मोटारनिर्मिती कंपनी आणि भारतातील पहिली विमाननिर्मिती करणारी 'हिंदुस्थान एअरक्राफ्ट' या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या..


इतर उद्योग... 
पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा यशस्वी प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली... 
प्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अ‍ॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून त्या निवारण्याचा पूर्ण प्रयत्न केला... 


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. वालचंद यांच्या निधनानानंतर त्यांचे भाऊ लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.. वालचंद यांनी जिवंतपणी ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणातून भारताला मुक्त करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उच्च ध्येयापोटीच अनेक नवनव्या उद्योगधंद्यांचे साहसी उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी रीत्या पार पाडले. आज त्यांच्यामुळेच भारतात अनेक बिझनेस चालू झाले व त्यांच्या मुळेच भारतात अनेक मोठमोठे उद्योजक होऊ शकले..