21 वर्षीय तरुणी बनली 'जगातील तरुण स्व-निर्मित अरबपती'

21 वर्षीय तरुणी बनली 'जगातील तरुण स्व-निर्मित अरबपती'

बिझनेस जगतातील छोट्या-मोठ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम 'फोर्ब्स' हे मॅगेझिन करीत असते. कोणता बिझनेस वाढला, कोणत्या बिझनेसची उलाढाल किती, सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंतशाली बिझनेसमन कोण आहे... ही सर्व माहिती आपल्या 'फोर्ब्स' या मॅगेझिनमार्फत मिळते... याच मॅगझिनने काही दिवसांपूर्वी 'फोर्ब्स बिलेनिअर'स लिस्ट' जाहीर केली. 

या यादीत 'जगातील तरुण स्व-निर्मित अरबपती महिला' म्हणून 21 वर्षीय तरुणी कायली जेनरने अग्रस्थान पटकवले. पहिल्या क्रमांकासह तिने अनेक विक्रम रचले आहेत, त्यामधील महत्त्वाचा म्हणजे फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गला तिने मागे सारले आहे. मार्कने वयाच्या 23 व्या वर्षी या यादीत स्थान मिळवले होते.


काय आहे कायलीचा बिझनेस... 21 वर्षीय कायली जेनरचा कॉस्मेटिक ब्रॅण्ड आहे. त्याचे नाव 'कायली कॉस्मेटिक्स' असे आहे. नोव्हेबर 2015 साली तिने हा ब्रॅण्ड लॉन्च केला होता महिला वर्गामध्ये हा ब्रॅण्ड फेसम आहे. गेल्यावर्षी या ब्रॅण्डने 360 मिलियन अमेरिकन डॉलरच्या उत्पादनांची विक्री केली. या विक्रीमुळेच कायलीचे या यादीतील स्थान भक्कम झाले. 


फक्त 12 कर्मचारी... कायली कॉस्मेटिक्सच्या ब्रॅण्डची किंमत 1 बिलियन एवढी असली तरीही कंपनीत फक्त 12 कर्मचारीच काम करतात. त्यातही सात पूर्ण वेळ तर पाच पार्ट टाईम कर्मचारी आहेत. बाकीचे पूर्ण काम कायलीने आऊटसोर्स केले आहे.


काम आऊटसोर्स करण्यावर भर... कायली जास्तीत जास्त काम आऊटसोर्स करण्यावर भर देते. म्हणजे स्वतः कंपनीत कर्मचा-यांमध्ये गुंतवणूक करता गरज लागेल तेव्हा बाहेरुन काम करवून घेणे. यामुळे कमीतकमी खर्चात काम होते. तिने आपल्या बिझनेसमधील मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग आणि सेल्स ही महत्त्वाची कामं आऊटसोर्स केली आहेत.

आईलाच मॅनेजर बनवले... कायलीने जेव्हा चार वर्षापूर्वी 'कायली कॉस्मेटिक्स' एक स्टार्टअप म्हणून सुरु केले. तेव्हापासून तिने आपल्या आईला बिझनेसमध्ये सहभागी करुन घेतले. कायलीची आई 'कायली कॉस्मेटिक्स'चे फायनान्स आणि पब्लिक रिलेशन हे प्रमुख विभाग सांभाळते.