वाचण्यामागचे नेमकं गणित काय आहे...

वाचण्यामागचे नेमकं गणित काय आहे...

"अधिकाधिक वाचन करणे" ही यशस्वी व्यक्तींची एक जमेची बाजू आहे. जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर वाचन नक्कीच केलं पाहिजे, असा सल्ला कोण देत नसेल तर नवलचं... 

लहानपणापासून आपल्याला "काहीतरी वाचं" असा सल्ला वडिलधारे देतच येतात; पण आपण काही त्यांचा सल्ला ऐकत नाही. 'पुस्तक वाचने म्हणजे रटाळ...' 'कोण हे करणार?' 'मला तर पुस्तक हातात घेतलं की झोपच येते...' अशा लोकांच्या अनेक प्रक्रिया आपण ऐकतो.


"वाचाल तर वाचाल!" अशी एक म्हणं आपल्याकडे प्रचलित आहे आणि ही म्हण तंतोतंत खरी आहे. अधिकाधिक वाचन केल्यामुळे मनुष्य प्रगल्भ होतो, त्याच्याकडील ज्ञान वाढते, नवनवीन गोष्टी कळतात... म्हणूनच वाचने आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे. यासाठी आपण वाचण्यामागचे गणित नेमकं काय आहे, ते पाहू यात...

यासाठी एक साधं सोप्पं गणित... समजा तुम्ही दररोज कोणत्याही पुस्तकाची 25 पानं वाचत आहात. 


तर महिन्याला तुम्ही 750 पानं वाचता म्हणजे साधारण 2 ते 4 पुस्तक तुम्ही वाचता.

असेच तुम्ही दर महिन्याला वाचत राहिला तर वर्षाला तुम्ही 9,000 पानं म्हणजेच 30 ते 40 पुस्तकं वाचता.

वर्षभरात 30 ते 40 पुस्तकं वाचल्यावर केवढे अमर्याद ज्ञान आणि आपल्याकडील प्रगल्भता कितपत वाढेल याबाबत आपण विचारही करु शकत नाही. तर मित्रांनो हे होतं वाचण्यामागचे नेमकं गणित.


विद्यार्थी, कर्मचारी आणि उद्योजक मित्र-मैत्रिणींना माझी कळकळीची विनंती आहे की, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे तर वाचण्यावाचून गत्यंतर नाही. तुमचे वाचनं तुम्हाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल हे मात्र नक्की!