
"मार्केटिंग म्हणजे काय रे भाऊ?" असं आपल्याला कोणी विचारलं तर आपण लगेच उत्तर देऊ... "आपले उत्पादन किंवा सेवा लोकांना कळवून देणे जेणेकरुन ग्राहक ते प्रोडक्ट किंवा सेवा विकत घेतील... त्यासाठी ज्या माध्यमांचा वापर करणे यास मार्केटिंग म्हणजेच मराठी विपणन असे म्हणतात!" हुश्श.... यासारखी मार्केटिंगची डेफिनेशन आपण कॉलेजमध्ये रटली पण मार्केटिंग हे त्यातून अधिक आहे. मार्केटिंग म्हणजे सदर उत्पादन किंवा सेवा ग्राहकांच्या मनावर खोलवर बिंबवणे. एक आपलेपणा, एक संबंध प्रस्थापित करणं, हे म्हणजे मार्केटिंग...
उदा. पारले-जी - लहानातला
लहान मुलगा आणि
वयोवृद्ध अशी सर्व
मंडळी पारले-जी
बिस्कीट चवीने खातात.
कोका-कोला - जर कोण
म्हणालं, "थंडा मतलब?"
समोरचा तडक उत्तर
देईल, "कोका-कोला"
बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
तुमच्या उत्पादन आणि सेवांचा
मार्केटमध्ये ब्रॅण्ड तयार झाला
पाहिजे. ग्राहक तुमच्या उत्पादन
आणि सेवेशी एकरुप
झाला पाहिजे तरच
तुम्ही मार्केटिंगमध्ये यशस्वी व्हाल आणि
तुमच्य कंपनी किंवा बिझनेसमध्ये
मोठ्याप्रमाणावर रेव्हेन्यू येईल.
आज 'स्नेहलनीती' मराठी उद्योजकांसाठी
काही मार्केटिंग टिप्स
घेऊन आलो आहोत.
या मार्केटिंग टिप्स
अमेरिकन डॉट कॉम
बिझनेसमन आणि लेखक
सेथ गॉडिन यांनी
अनेक वर्षाच्या अभ्यासातून
नोंदविलेल्या आहेत. पाहू यात
कोणत्या आहेत त्या
मार्केटिंग टिप्स...
१. जर तुम्ही
तुमचे पैसे सर्वोत्तम
उत्पादन किंवा सेवा निर्माण
करण्यासाठी खर्च केले
तर तुम्हाला त्याची
जाहिरात करावी लागणार नाही!
२. लोकं उत्पादन
आणि सेवा विकत
घेत नाहीत, ते
त्या प्रोडक्ट सोबत
जडलेले नातेसंबंध, गोष्टी आणि
जादू विकत घेतात!
३. तुमच्या उत्पादनासाठी ग्राहक
शोधू नका ग्राहकांना
कोणतं उत्पादन हवयं,
त्याचा शोध लावा!
भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा
४. प्रॉडक्ट आणि सेवा
असं काहीच नसतं;
तुम्ही त्यासंबधींची कथा कशी
सांगता यावर सार
काही अवलंबून असतं!
५. बिझनेसमध्ये एकच गोष्ट
होते; तुम्ही उल्लेखनीय
ठरता किंवा अदृश्य
होता!
६. जाहिरात थांबवा, नव
काही निर्माण करा!
७. जर उत्पादनाचा
खप होत नसेल
तर जाहिरात बदलू
नका, उत्पादन बदला!
मराठी उद्योजकांनो आणि उद्योजक
बनण्याची इच्छा असणा-यांनो
या होत्या काही
मार्केटिंग टिप्स ज्या सेथ
गॉडिन यांनी आपल्या
अनुभवातून मांडल्या आहेत. या
पैकी सर्वच आपल्या
बिझनेसमध्ये उपयोगी पडतील असे
नाही. तुमच्या बिझनेसचा
आत्मा काय आहे,
ते ओळखा. वरील
मार्केटिंग टिप्स समजून घ्या.
नंतर योग्य ती
टिप्स आपल्या बिझनेसमध्ये
वापरा.