या मॅचबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यातही डे-नाइट क्रिकेट पेक्षा 'पिंक बॉल'ने खेळल्या जाणाऱ्या मॅच बद्दल लोक जास्त उत्सुक आहेत. तुम्हालाही या पिंक बॉल बद्दल उत्सुकता असेलच.. तर हा पिंक बॉल नक्की काय आहे, हा बॉल डे-नाइट मॅचमध्ये का वापरला जातो, या बॉलसाठी गुलाबी रंगच का, या बॉलची वैशिष्ट्ये काय आहेत हे सर्व आपण जाणून घेऊया..
* डे-नाईट टेस्ट काही वेळ सूर्यप्रकाशात आणि काही वेळ कृत्रिम लाईट्समध्ये खेळली जाते. टेस्ट मॅचमध्ये कपड्यांचा रंग पांढरा असल्यामुळे खेळताना पांढरा बॉल दिसून येत नाही. तसेच लाल बॉल कृत्रिम लाईट्स मध्ये दिसण्यात अडचण असते.. यावर उपाय म्हणून ऑप्टिक यलो आणि ऑरेंज रंगाच्या बॉलचा वापर करण्यात आला. मात्र या दोन रंगांच्या तुलनेत पिंक बॉलची व्हिझिबलिटी अधिक आहे. गवतावर हा बॉल नीट दिसू शकतो तसेच कृत्रिम लाईट्समध्ये बॅट्समनला हा बॉल सहजतेने दिसू शकतो. म्हणून पिंक बॉलने दिवस-रात्र कसोटीत खेळवला जातो..
* लाल बॉलच्या निर्मितीसाठी एकूण 2 दिवस लागतात. तर या लाल बॉलच्या तुलनेने पिंक बॉलच्या निर्मितीसाठी अधिक कालावधी लागतो. पिंक बॉलच्या निर्मितीसाठी कमीतकमी 8 दिवस लागतात. * हा पिंक बॉल इंपोर्टेड लेदरने बनवला जातो. तसेच पिंक बॉलवर गुलाबी रंगाचा अतिरिक्त मुलामा दिला जातो. जेणेकरून कृत्रिम प्रकाशात हा बॉल चमकेल. याशिवाय बॉलची शिलाई ही पांढऱ्या ऐवजी काळा धाग्याने करण्यात येते.
* पिंक बॉल मधील इनर कोर हे कॉर्क आणि रब्बरने बनविले जाते. * या पिंक बॉलचा परिघ 22.5 सेमीच्या आत असतो. लाल बॉलपेक्षा पिंक बॉल हलका असतो आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अधिक प्रमाणात स्विंग होतो. पिंक बॉल सॉफ्ट होऊ लागतो तसे त्याचे स्विंग होणे कमी होत जाते.
* या बॉलमध्ये 3 प्रकारचे स्टिचेस असतात. एक लीप स्टिच आणि दोन प्रोनाउन्स्ड स्टिचेस मिळून बॉलच्या दोन्ही बाजूंना 78 स्टिचेस असतात
* पिंक बॉलमधील प्रोनाउन्स्ड स्टिचेस दवामध्ये खेळण्यासाठी उत्तम ग्रीप देतो. त्यामुळे दवबिंदूमुळे बॉल घसरण्याची शक्यता ही कमी होते.
तर आज आपण पिंक बॉलची वैशिष्ट्ये आणि माहिती बघितली.. यासारख्याच अनेक ट्रेंडिंग टॉपिक्स वर माहिती मिळविण्यासाठी 'स्नेहलनीती'ला फॉलो करा..
आज भारतात सगळीकडे लोकांचे लक्ष टीव्ही किंवा मोबाईलवर लागून असणार आहे!! कारण तर सर्वांनाच माहीत असेल, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच आजपासून कोलकातामधील ईडन गार्डन्स या मैदानावर रंगणार आहे..
शुक्रवार, 22 नोव्हेंबर म्हणजे आजच टीम इंडिया ईडन गार्डन्स स्टेडियमवर पहिल्यावहिल्या डे-नाईट टेस्टच्या निमित्ताने बांग्लादेशसोबत लढणार आहे. या सामन्यांमधून भारतीय क्रिकेटमधला नवा अध्याय लिहिला जाणार आहे. याचे मुख्य आकर्षण आहे ते गुलाबी चेंडू म्हणजेच पिंक बॉलने ही टेस्ट मॅच खेळली जाणार आहे. लाइमलाईटमध्ये असणाऱ्या पिंक बॉलने खेळली जाणारी भारताची ही पहिलीच टेस्ट मॅच आहे.. तसेच भारतीय टीम पहिल्यांदा एका पिचवर पाच दिवस डे-नाइट क्रिकेट खेळणार आहे..