Blog-Image

अशाच एका यशस्वी उद्योजीकेची कहाणी सुद्धा रोमांचित करणारी आहे. सूची मुखर्जी - या एक अशा महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर कोटींची कंपनी उभी केली आणि आज त्या अनेक महिलांचे प्रेरणास्रोत बनल्या आहेत.. लंडनच्या कॅंब्रिच युनिव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्स आणि मॅथ्समध्ये बीए तसेच इकोनॉमिक्स मधून फायनान्समध्ये मास्टर्स करणाऱ्या सूची मुखर्जी या 'लाइमरोड डॉट कॉम (LimeRoad.com)' या ऑनलाईन फॅशन स्टोअरच्या फाउंडर आणि सीईओ आहेत. या शॉपिंग पोर्टलवर स्त्रियांच्या लाईफ स्टाईलशी संबंधित उत्पादने मिळतात. या यशामुळे दोन मुलांची आई असलेल्या सुची मुखर्जी या  स्वप्ने पूर्ण करण्यात आणि जीवनात बदल घडवून आणण्यात गुंतलेल्या स्त्रियांसाठी प्रेरणा स्त्रोत बनल्या आहेत... सूची मुखर्जी यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेहमन ब्रदर्स कंपनीमध्ये सीनियर एसोसिएट म्हणून त्यांची पहिली नोकरी केली होती. याच  जवळपास ५ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी टेलीकॉम मीडिया टेक्नोलॉजी आणि फाइनेंस इंस्टीट्यूशनकडे लक्ष केंद्रित केले. या क्षेत्रातील ज्ञान मिळविल्यानंतर त्यांनी 'वर्जिन मीडिया कंपनी'मध्ये 'डायरेक्टर फॉर चेंज एंड बिजनस डेवलपमेंट'चे पद सांभाळले..

त्याचप्रमाणे त्यांनी ऑनलाइन वीडियो कॉल्स एप्लीकेशल 'स्काइप' आणि ई-कॉमर्स कंपनी 'ईबे' साठी सुद्धा काम केले. इतकेच नाही तर सुची यांनी त्यांच्या लीडरशिप स्किलच्या जोरावर केवळ दोन वर्षात जाहिरातीचे पोर्टल ‘गमट्री’ला यूकेमधील सर्वात यशस्वी पोर्टल बनविले. लंडनमध्ये असताना एकदा सूची एक मॅगझीन वाचत बसल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांना एक ज्वेलरी अतिशय आवडली. परंतु ती भारतातील एका दुकानात उपलब्ध असल्याने साहजिकच सूची ती घेऊ शकल्या नाही. त्यावेळी त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले की भारतात अशी कोणतीही कंझ्यूमर टेक्नोलॉजी नाही जिथे महिलांसाठी चांगल्या ऍक्सेसरीज आणि प्रॉडक्ट्स सहज मिळेल. त्याचप्रमाणे त्यांना हे जाणवले की भारतात स्त्रियांच्या फॅशन लाईफ स्टाईल संबंधित प्रॉडक्ट्स खुद्द भारतात आणि इतर देशांमध्ये बसून बघायचा आणि विकत घेण्याचा कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. यामुळे भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्याचा निर्णय सूची यांनी केला आणि लाइमरोड डॉट कॉम उदयास आले. 

एक स्त्री असल्यामुळे सूची यांना माहित होते की महिलांना नेमके काय आवडू शकते. त्यामुळे लाइमरोड डॉट कॉमच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना शॉपिंगशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.. लाइमरोड मधून आपल्याला कपडे, ऍक्सेसरीज, होम फर्निशिंग प्रोडक्ट्स विकत घेऊ शकतो. लाइमरोड या वेबपोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपवर स्त्रिया आणि मुली आकर्षक ज्वेलरी, ब्रँडेड कपडे, पर्स असे फॅशन लाईफ स्टाईलशी संबंधित वस्तू खरेदी करू शकतात व शेअर सुद्धा करू शकतात. या पोर्टलचा दावा आहे की ८५% ऑर्डर्स या ऑरगॅनिक ट्रॅफिकने येतात आणि ७०% ऑर्डर्स या मोबाईल अ‍ॅपवरून येतात..

लाइमरोड अ‍ॅपची पोहोच ४०० मिलियनपेक्षा अधिक स्मार्टफोन्स पर्यंत पोहोचली आहे, ज्यात ३० ते ५०% पर्यंत महिला समाविष्ट आहेत. लाइमरोड डॉट कॉमचे यश बघता टायगर ग्लोबल, लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर, मॅट्रिक्स पार्टनर इंडिया इत्यादी कंपन्यांनी आतापर्यंत तीन श्रेणींमध्ये ५० मिलियन डॉलरएवढा निधी दिला आहे. लाइमरोडला अनुक्रमाने ३० मिलियन डॉलर, १५ मिलियन डॉलर आणि ५ मिलियन डॉलर्सचे निधी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ही शॉपिंग साईट अत्यंत नव्या प्रकारे ग्राहकांसमोर येत आहे.. दररोज नवनवीन प्रॉडक्ट्स या साईट वर अपलोड केले जातात. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवे बदल करून लाइमरोड आता महिलांची अत्यंत आवडती शॉपिंग साईट बनली आहे. सोबतच सूची मुखर्जी यांनी लाइमरोड मार्फत हे दाखवून दिले आहे की एक स्त्री सुद्धा मोठी उद्योजिका बनू शकते व यशस्वी होऊ शकते. 

बिझनेस अनेकांना करायचा असतो, पण त्यात उतरणारे फारच कमी असतात. त्याहून ही कमी असतात ते उद्योगक्षेत्रात यशस्वी होणारे लोक. स्वतःच्या पायावर उभे राहून बिझनेसमध्ये उतरायचे आणि तो बिझनेस यशस्वी करून दाखवायचा हे जिद्दीने ठरविणारेच बिझनेसमध्ये सफल होऊ शकतात.  त्यात महिलांचे प्रमाण कमी असले तरीही आता यशस्वी उद्योजकांच्या यादीमध्ये स्त्रियाही वरचढ ठरू लागल्या आहेत.. अनेक महिला उद्योजिका आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात सरस ठरत आहेत..  

अशाच एका यशस्वी उद्योजीकेची कहाणी सुद्धा रोमांचित करणारी आहे. सूची मुखर्जी - या एक अशा महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर कोटींची कंपनी उभी केली आणि आज त्या अनेक महिलांचे प्रेरणास्रोत बनल्या आहेत.. लंडनच्या कॅंब्रिच युनिव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्स आणि मॅथ्समध्ये बीए तसेच इकोनॉमिक्स मधून फायनान्समध्ये मास्टर्स करणाऱ्या सूची मुखर्जी या 'लाइमरोड डॉट कॉम (LimeRoad.com)' या ऑनलाईन फॅशन स्टोअरच्या फाउंडर आणि सीईओ आहेत. या शॉपिंग पोर्टलवर स्त्रियांच्या लाईफ स्टाईलशी संबंधित उत्पादने मिळतात. या यशामुळे दोन मुलांची आई असलेल्या सुची मुखर्जी या  स्वप्ने पूर्ण करण्यात आणि जीवनात बदल घडवून आणण्यात गुंतलेल्या स्त्रियांसाठी प्रेरणा स्त्रोत बनल्या आहेत... सूची मुखर्जी यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेहमन ब्रदर्स कंपनीमध्ये सीनियर एसोसिएट म्हणून त्यांची पहिली नोकरी केली होती. याच  जवळपास ५ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी टेलीकॉम मीडिया टेक्नोलॉजी आणि फाइनेंस इंस्टीट्यूशनकडे लक्ष केंद्रित केले. या क्षेत्रातील ज्ञान मिळविल्यानंतर त्यांनी 'वर्जिन मीडिया कंपनी'मध्ये 'डायरेक्टर फॉर चेंज एंड बिजनस डेवलपमेंट'चे पद सांभाळले.. त्याचप्रमाणे त्यांनी ऑनलाइन वीडियो कॉल्स एप्लीकेशल 'स्काइप' आणि ई-कॉमर्स कंपनी 'ईबे' साठी सुद्धा काम केले. इतकेच नाही तर सुची यांनी त्यांच्या लीडरशिप स्किलच्या जोरावर केवळ दोन वर्षात जाहिरातीचे पोर्टल ‘गमट्री’ला यूकेमधील सर्वात यशस्वी पोर्टल बनविले. लंडनमध्ये असताना एकदा सूची एक मॅगझीन वाचत बसल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांना एक ज्वेलरी अतिशय आवडली. परंतु ती भारतातील एका दुकानात उपलब्ध असल्याने साहजिकच सूची ती घेऊ शकल्या नाही. त्यावेळी त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले की भारतात अशी कोणतीही कंझ्यूमर टेक्नोलॉजी नाही जिथे महिलांसाठी चांगल्या ऍक्सेसरीज आणि प्रॉडक्ट्स सहज मिळेल. त्याचप्रमाणे त्यांना हे जाणवले की भारतात स्त्रियांच्या फॅशन लाईफ स्टाईल संबंधित प्रॉडक्ट्स खुद्द भारतात आणि इतर देशांमध्ये बसून बघायचा आणि विकत घेण्याचा कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. यामुळे भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्याचा निर्णय सूची यांनी केला आणि लाइमरोड डॉट कॉम उदयास आले. 

एक स्त्री असल्यामुळे सूची यांना माहित होते की महिलांना नेमके काय आवडू शकते. त्यामुळे लाइमरोड डॉट कॉमच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना शॉपिंगशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.. लाइमरोड मधून आपल्याला कपडे, ऍक्सेसरीज, होम फर्निशिंग प्रोडक्ट्स विकत घेऊ शकतो. लाइमरोड या वेबपोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपवर स्त्रिया आणि मुली आकर्षक ज्वेलरी, ब्रँडेड कपडे, पर्स असे फॅशन लाईफ स्टाईलशी संबंधित वस्तू खरेदी करू शकतात व शेअर सुद्धा करू शकतात. या पोर्टलचा दावा आहे की ८५% ऑर्डर्स या ऑरगॅनिक ट्रॅफिकने येतात आणि ७०% ऑर्डर्स या मोबाईल अ‍ॅपवरून येतात.. लाइमरोड अ‍ॅपची पोहोच ४०० मिलियनपेक्षा अधिक स्मार्टफोन्स पर्यंत पोहोचली आहे, ज्यात ३० ते ५०% पर्यंत महिला समाविष्ट आहेत. लाइमरोड डॉट कॉमचे यश बघता टायगर ग्लोबल, लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर, मॅट्रिक्स पार्टनर इंडिया इत्यादी कंपन्यांनी आतापर्यंत तीन श्रेणींमध्ये ५० मिलियन डॉलरएवढा निधी दिला आहे. लाइमरोडला अनुक्रमाने ३० मिलियन डॉलर, १५ मिलियन डॉलर आणि ५ मिलियन डॉलर्सचे निधी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ही शॉपिंग साईट अत्यंत नव्या प्रकारे ग्राहकांसमोर येत आहे.. दररोज नवनवीन प्रॉडक्ट्स या साईट वर अपलोड केले जातात. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवे बदल करून लाइमरोड आता महिलांची अत्यंत आवडती शॉपिंग साईट बनली आहे. सोबतच सूची मुखर्जी यांनी लाइमरोड मार्फत हे दाखवून दिले आहे की एक स्त्री सुद्धा मोठी उद्योजिका बनू शकते व यशस्वी होऊ शकते.