Blog-Image

Parle कसा बनला जगातला सर्वात मोठा बिस्किट ब्रँड? तुम्हाला ते दिवस आठवतायत का, जेव्हा दिवसाची सुरुवात चहा आणि पार्ले जी बिस्कीट पासून व्हायची. अनेक जण पार्लेजीचं बिस्किट पाण्यात सुद्धा बुडवून खायचे. कित्तेक जण आजही त्यांच्या दिवसाची सुरुवात पार्लेजी बिस्किट खाऊन करत असतिल.

आता खासकरून शहरी भागांमध्ये पार्ले जी बिस्किटची जागा पार्लेच्याच अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सने घेतली आहे. कमी किंमत आणि जास्त नफा हेच त्यांच्या बिझनेसचं मूळ सूत्र राहिलं आहे. गेली 25 वर्ष या ब्रँडने आपल्या बिस्किटांची किंमत जवळपास सारखिच ठेवली आहे. आधी पार्लेजीचा बिस्किट पुडा 3 रुपयांत मिळायचा आता तो 5 रुपयाला मिळतो इतकंच. पार्ले स्वातंत्र्य पूर्व काळापासून बिस्किट जगतात आपला जम बसवून आहे. विशेष म्हणजे तो जगातला सर्वात जास्त विकला जाणारा बिस्किट ब्रँड आहे.

विजय चौहान हे चौहान कुटुंबातील प्रमुख असून पार्लेच्या सर्व उत्पादनांचे नियंत्रण त्यांच्या हाताखाली आहे. कंपनीने कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये 30 दशलक्ष रुपयांचे बिस्किट दान केले. पार्ले कंपनीच्या भारताव्यतिरिक्त 8 देशांमध्ये फॅक्टरीज आहेत.

पार्ले जी चं बिस्किट सुरुवातीपासूनच खूपच कमी किमतीत उपलब्ध होतं. बहुतेक, भारतातील लोक हे प्राईज सेंसीटीव्ह आहेत ही गोष्ट पार्ले कंपनीने पक्की ध्यानात ठेवली आहे. भारतातला पहिलाच बिस्किट ब्रँड असल्यामुळे प्रत्येक भारतीयाकडे, घराघरात हे बिस्किट असायचंच. पार्ले-जी ने सुद्धा वाढत्या महागाईसोबत किंमत न वाढवता आपली किंमत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून प्रत्येकाला हे बिस्किट विकत घेता यावं. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का? या पार्लेजी ची किंमत जरी तिच राहिली असली तरी त्यांनी इतक्या वर्षात आपल्या पुड्यातील बिस्किटांची संख्या आणि वजन कमी केलं आहे. याला म्हणतात स्ट्रॅटजी.. परंतू, पार्ले बिस्किट फक्त पार्ले-जी पर्यंतच मर्यादित राहिला नाही. त्यांनी शहरी भागातील ग्राहकांसाठी मोनॅको, क्रॅक-जॅक, हाईड-अँड सिक, 20-20 कुकीज, पार्ले मारी, हॅपी-हॅपी असे विविध प्रकारचे बिस्किटही आणले.

अशाप्रकारे पार्ले-जी मध्ये होणाऱ्या कमी नफ्याचं गणित बाकीच्या ब्रँड्ससोबत जुळवलं जातं. शिवाय, पार्ले कंपनी त्यांचा कच्चा माल कमीत कमी किंमतीत खरेदी करते. तुम्ही निरीक्षण केलं असेल, तर एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात येईल इतक्या वर्षात किंमत सारखी असली, तरी पार्लेजी बिस्किटांवरचं पॅकींग बदलत आलेलं आहे. आधी ते वॅक्स पेपरमध्ये व्रॅप केलेलं असायचं, तर आता ते फक्त एका साध्या प्लास्टिक कव्हरमध्ये पॅक केलेलं असतं.

चव, गुणवत्ता आणि कमी किंमत अबाधित ठेवण्याचाच पार्लेजीचा प्रयत्न राहिलेला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात टिकून राहण्यासाठी आणि सर्वच वयोगटातील तसंच छोट्या-मोठ्या अशा सगळ्याच कुटुंबांतील थोरामोठ्यांना खिळवून ठेवण्यासाठी पार्लेजी ने सुरुवातीला 2 रुपयांपासून ते अगदी मोठ्या कॅनमध्ये सुद्धा पार्ले जी बिस्किट विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. जेणेकरून सर्वांनाच त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या आवडीचं बिस्किट घेता यावं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या फक्त आणि फक्त ग्राहकांच्या गरजा, त्यांची आवड, त्यांची आर्थिक परिस्थिती यांचा विचार करूनच पार्ले कंपनीने आपले प्रोडक्ट्स बाजारात आणले आणि त्यांना अपेक्षित यश सुद्धा मिळत गेलं. त्यांच्या यशाचं गमक हेच आहे, की ते त्यांच्या ग्राहकांना प्राधान्य देतात.

पार्लेचा मुख्य कारखाना मुंबईच्या पार्ले भागात आहे. याशिवाय राजस्थान, बेंगलुरू, हायद्राबाद, गुजरात मधलं कच्छ, खोपोली, उत्तराखंड मधलं पटनागर, उत्तराखंडमधलं सितारगंज, हरयाणातलं बहादुरगड, बिहारमधलं मुझफ्फरपूर इथं त्यांचे मोठमोठे कारखाने आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे काही कारखाने कॉन्ट्रॅक बेसिसवर सुद्धा आहेत. हे झालं भारतातलं. भारताबाहेर कॅमेरून, नायजेरिया, घाना, इथियोपिया, केनया, आयव्हरी कोस्ट, नेपाळ, मेक्सिको या देशांमध्ये देखील त्यांचे कारखाने आहेत. म्हणजेच जगभरातलं एक विस्तृत नेटवर्क हा देखील त्यांच्या यशाचा एक भाग आहे.

पार्लेजी बिस्किटांमुळे जगप्रसिद्ध झालेला पार्ले ब्रँड आता केवळ बिस्किटांपुरता मर्यादित राहिला नाही. बिस्किट, चॉकलेट, स्नॅक्स, टोस्ट, केक एवढंच नाही तर पार्ले कंपनीने सध्याची गरज ओळखून त्यांचं पार्ले सुरक्षा नावाचं हँड सॅनिटायजर सुद्धा बाजारात आणलं आहे. कच्चा मँगो, मेलोडी, पॉपीन्स हे त्यांचे चॉकलेट्स लोकांच्या पसंतीला उतरले. आता तर त्यांनी हॅपी हॅपी केक सुद्धा बाजारात आणले आहेत. कुठल्याही परिस्थित आपले ग्राहक आपल्यापासून तुटू नयेत याचसाठी हा अट्टाहास.. आणि त्यांच्या या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे कमी किंमत, परवडणारे प्रोडक्ट्स...

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा कशाप्रकारे वस्तूंच्या किंमती नियंत्रित ठेवून उत्पादनांची व्याप्ती वाढवून व्यापार केला जातो. हे प्रत्येक उद्योजकाने पार्लेजी कडून शिकण्यासारखं आहे.