Blog-Image

प्रसिद्ध अभिनेते सुद्धा त्यांना मार्गदर्शनासाठी कोचची निवड करतात. हॉलिवुड अभिनेता लिओनार्डो दिकॅप्रिओ हादेखील त्यापैकीच एक. त्याने अनेक भूमिका साकारण्यासाठी टोनी रॅबिन्स या लाईफ कोचची मदत घेतली होती. व्यवसाय प्रशिक्षण हे काही सर्वात यशस्वी उद्योजकांद्वारे वापरलं जाणारं एक मौल्यवान स्त्रोत आहे आणि जर ते त्यांच्यासाठी कार्य करू शकतं तर निश्चितपणे तुमच्यासाठी सुद्धा कार्य करू शकतं.

एक चांगला व्यवसाय प्रशिक्षक आपल्याला इतर शक्तिशाली लोकांशी कनेक्ट करून देऊ शकतो, ज्यांना तुमच्या व्यवसायाची माहिती, जाण असेल आणि जे तुम्हाला व्यवसाय वाढविण्यात मदत करू शकतील. यश बहुतेकदा तुम्हाला काय माहित आहे त्यापेक्षा तुम्ही कोणाला ओळखता यावर अवलंबून असते. एक चांगला प्रशिक्षक तुम्हाला तुमचे सध्याचे व्यवसाय नेटवर्क कसे वापरावे आणि वाढवावे याबद्दल सल्ला देतो.

बिझनेस कोचला तुमच्या क्षेत्रातला विस्तृत अनुभव असतो. तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा कोणतं पाऊल तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं हे ओळखण्यात ते तुम्हाला मदत करतात.   सध्याचं व्यावसायिक जग हे कठीण आणि स्पर्धात्मक आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणाच्यातरी मदतीची गरज आहे. इथे प्रकाशाच्या वेगाने गोष्टी बदलत असतात आणि तुम्ही नवीन ट्रेन्ड्स आत्मसात केल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या कामात मागे पडाल.

जी स्ट्रॅटेजी काल तुमच्या कामी आली, जरूरी नाही ती उद्या सुद्धा लागू होईल. बिझनेस कोच तुम्हाला अप-टु-डेट राहण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्पर्धात्मक राहू शकता. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा तुम्ही वैयक्तिक प्रगती आणि वाढीला महत्त्व देत नसाल तर तुम्ही इतरांच्या तुलनेत मागेच रहाल.  एक गोष्ट निश्चित माहीत आहे, तुमचा व्यवसाय कोणताही असो तुम्ही वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी वचनबद्ध नसल्यास मागे राहू शकता.

आयुष्यात बदल खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी भूमिका घेऊन व्यवसाय करत असाल, तर तुम्ही तग धरू शकणार नाही, स्पर्धेच्या ओघात वाहून जाल. प्रत्येकालाच कधीना कधी कोणाच्यातरी मदतीची गरज भासत असते. एवढंच नाही तर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती सुद्धा अडचणीच्या वेळी एक्सपर्ट्सची मदत घेतात. 

थोडी मदत घेतल्याशिवाय कोणीही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी कोचींगच्या मदतीने आपले आयुष्य किंवा बिझनेसमध्ये एक नवी उंची गाठली आहे. बिझनेस कोच तुम्हाला तुमचा नफा वाढवण्यासाठी, एक कार्यक्षम लीडर बनण्यासाठी, आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत करतो. 

बिझनेस कोचच्या मदतीने प्रगती साधता येते यावर बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही. बिझनेस कोच तुमच्यासाठी काम करत नाही तर तुमच्या बरोबरीने काम करतो. बिझनेस कोच तुमच्या कंपनीमध्ये चीअरलीडरची भूमिका पार पाडतो असं म्हणा हवं तर. मला सर्व काही समजतं, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक आहे. अशी विचरसरणी तुम्हाला मागे खेचते आणि कोणाची मदत घेण्यापासून परावृत्त करते.   

जर तुम्हाला अपेक्षित निकाल तुमच्या बिझनेसमधून मिळत नसेल किंवा तुम्हाला सल्ला देण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाच्या प्रतिक्षेत असाल, तर बिझनेस कोचमध्ये तुमचे पैसे गुंतवणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. 

तुम्ही उद्योजक आहात का? आणि असाल तर तुम्हाला गाईड करणारा बिझनेस कोच हायर केला आहे का? ते तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतील असा प्रश्न तुम्हाला पडतोय का?  बिझनेस कोच तुम्हाला तुमच्या बिझनेस वाढीसाठी वैयक्तिक पातळीवर सल्ला देतात. अशा प्रकारचा सल्ला घेणं हे तुमच्या बिझनेसच्या यशाची किल्ली ठरू शकतं. तुम्हाला माहिती आहे का जगभरातील नावजलेले यशस्वी उद्योजक हे बिझनेस कोचला प्राधान्य देतात.  इंट्युटचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बेनेट यांनी व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षक आवश्यक असल्याचे मान्य केले आहे. अगदी बराक ओबामा देखील सहमत आहेत, की व्यवसाय प्रशिक्षणामुळेच त्यांनी आपल्या कारकीर्दीत उन्नती केली. ओप्रा विन्फ्रे तिच्या यशाचं श्रेय त्यांची लाइफ कोच मार्था बेक यांना देतात आणि त्यांचं मत आहे, की यश केवळ स्वतःच्या जिवावर मिळवता येत नाही.  

प्रसिद्ध अभिनेते सुद्धा त्यांना मार्गदर्शनासाठी कोचची निवड करतात. हॉलिवुड अभिनेता लिओनार्डो दिकॅप्रिओ हादेखील त्यापैकीच एक. त्याने अनेक भूमिका साकारण्यासाठी टोनी रॅबिन्स या लाईफ कोचची मदत घेतली होती. व्यवसाय प्रशिक्षण हे काही सर्वात यशस्वी उद्योजकांद्वारे वापरलं जाणारं एक मौल्यवान स्त्रोत आहे आणि जर ते त्यांच्यासाठी कार्य करू शकतं तर निश्चितपणे तुमच्यासाठी सुद्धा कार्य करू शकतं. एक चांगला व्यवसाय प्रशिक्षक आपल्याला इतर शक्तिशाली लोकांशी कनेक्ट करून देऊ शकतो, ज्यांना तुमच्या व्यवसायाची माहिती, जाण असेल आणि जे तुम्हाला व्यवसाय वाढविण्यात मदत करू शकतील. यश बहुतेकदा तुम्हाला काय माहित आहे त्यापेक्षा तुम्ही कोणाला ओळखता यावर अवलंबून असते. एक चांगला प्रशिक्षक तुम्हाला तुमचे सध्याचे व्यवसाय नेटवर्क कसे वापरावे आणि वाढवावे याबद्दल सल्ला देतो. बिझनेस कोचला तुमच्या क्षेत्रातला विस्तृत अनुभव असतो. तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा कोणतं पाऊल तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं हे ओळखण्यात ते तुम्हाला मदत करतात.   सध्याचं व्यावसायिक जग हे कठीण आणि स्पर्धात्मक आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणाच्यातरी मदतीची गरज आहे. इथे प्रकाशाच्या वेगाने गोष्टी बदलत असतात आणि तुम्ही नवीन ट्रेन्ड्स आत्मसात केल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या कामात मागे पडाल. जी स्ट्रॅटेजी काल तुमच्या कामी आली, जरूरी नाही ती उद्या सुद्धा लागू होईल. बिझनेस कोच तुम्हाला अप-टु-डेट राहण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्पर्धात्मक राहू शकता. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा तुम्ही वैयक्तिक प्रगती आणि वाढीला महत्त्व देत नसाल तर तुम्ही इतरांच्या तुलनेत मागेच रहाल.  एक गोष्ट निश्चित माहीत आहे, तुमचा व्यवसाय कोणताही असो तुम्ही वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी वचनबद्ध नसल्यास मागे राहू शकता. आयुष्यात बदल खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी भूमिका घेऊन व्यवसाय करत असाल, तर तुम्ही तग धरू शकणार नाही, स्पर्धेच्या ओघात वाहून जाल. प्रत्येकालाच कधीना कधी कोणाच्यातरी मदतीची गरज भासत असते. एवढंच नाही तर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती सुद्धा अडचणीच्या वेळी एक्सपर्ट्सची मदत घेतात.  थोडी मदत घेतल्याशिवाय कोणीही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी कोचींगच्या मदतीने आपले आयुष्य किंवा बिझनेसमध्ये एक नवी उंची गाठली आहे. बिझनेस कोच तुम्हाला तुमचा नफा वाढवण्यासाठी, एक कार्यक्षम लीडर बनण्यासाठी, आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत करतो. 

बिझनेस कोचच्या मदतीने प्रगती साधता येते यावर बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही. बिझनेस कोच तुमच्यासाठी काम करत नाही तर तुमच्या बरोबरीने काम करतो. बिझनेस कोच तुमच्या कंपनीमध्ये चीअरलीडरची भूमिका पार पाडतो असं म्हणा हवं तर. मला सर्व काही समजतं, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक आहे. अशी विचरसरणी तुम्हाला मागे खेचते आणि कोणाची मदत घेण्यापासून परावृत्त करते.    जर तुम्हाला अपेक्षित निकाल तुमच्या बिझनेसमधून मिळत नसेल किंवा तुम्हाला सल्ला देण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाच्या प्रतिक्षेत असाल, तर बिझनेस कोचमध्ये तुमचे पैसे गुंतवणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.