Blog-Image

हो!! तुम्ही जे वाचताय ते अगदी बरोबर आहे. सततचा कामाचा ताण, चिडचिडेपणा आणि बदललेल्या जीवनशैलीतील इतर गोष्टी यामुळे मुख्यतः तरूणांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. भारतातही डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस फार गंभीर होत चालली आहे. या समस्येवर वेळीच उपाययोजना केली नाही तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात. 

कुशल पंजाबी या टिव्ही अभिनेत्याच्या आत्महत्येने पुन्हा डिप्रेशन या विषयावर सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण पुढे आलेले नाही तरीही त्याच्या वडिलांनी व मित्रपरिवाराने तो डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले.. एखाद्या अभिनेत्याने किंवा लोकप्रिय व्यक्तीने असे डिप्रेशनच्या आहारी जाऊन स्वतःला संपविणे ही गोष्ट मनाला हुरहूर लावून जाते. जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी यांसारख्या अभिनेत्रींनी सुद्धा डिप्रेशनमुळे स्वतःचे आयुष्य संपवले होते..

खरंच डिप्रेशनमुळे माणूस इतके टोकाचे पाऊल उचलतो का? आणि उचलतही असेल तर का? आयुष्यात येणाऱ्या समस्या एवढ्या मोठ्या असतात का किंवा बिझनेसमधील अपयश माणसाला इतके मोठे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडते का? असे सर्व प्रश्न मग समाजापुढे उभे राहतात. या समस्यांवर अनेक खात्रीलायक उपाय असतात, अनेकजण ते शोधतात सुद्धा. पण काही लोक प्रयत्न न करताच हार मानतात आणि मग डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन हँडल करता न आल्याने त्यांच्यापुढे एकच शेवटचा पर्याय उरतो...  अनेक लोकप्रिय अभिनेता-अभिनेत्री, बिझनेसमन, पब्लिक फिगर यांच्यासोबतच अगदी सामान्य मनुष्य सुद्धा डिप्रेशनचे शिकार होताना दिसत आहे. यामुळेच सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर्स यांचा बिझनेस सुद्धा वाढताना दिसत आहे.. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने सुद्धा ती डिप्रेशनमध्ये होती हे सांगितले होते. त्यानंतर बी टाऊनमध्ये आणि सोबतच सर्वसामान्यांमध्ये सुद्धा डिप्रेशनविषयी चर्चा रंगल्या होत्या. नुकताच प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा चित्रपट 'जोकर' याच कारणामुळे लोकप्रिय झाला. डिप्रेशनमुळे व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो हे या चित्रपटामधून लोकांपर्यंत पोहोचले. या चित्रपटाचा खूप बोलबाला सुद्धा झाला.. गेल्या काही वर्षांपासून भारतात डिप्रेशनचे प्रमाण वाढतच चालले आहे. अनेक जण काममध्ये आलेल्या अधिक ताणतणावामुळे डिप्रेशनमध्ये जातात, तर बिझनेमध्ये येणाऱ्या अपयशामुळे किंवा बुडत जाणाऱ्या बिझनेसमुळे, तर वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या ताणतणावामुळे सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात..

या डिप्रेशनमधून लवकरात लवकर बाहेर पडावे. त्यासाठी स्वतः स्ट्रॉंग बनणे आवश्यक आहे. मनाला खटकणाऱ्या गोष्टी कधीच मनात साठवून ठेवू नये. अशा गोष्टी साठवत ठेवल्यास मनावरचे ओझे वाढत जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या मानसिक तसेच शारीरिक आजारांचा सामना सुद्धा करावा लागतो. अशावेळी  काउन्सिलिंगचा आधार घेतल्यास डिप्रेशनमधून लवकर बाहेर पडत येते. अनेकजण डिप्रेशनला वेडेपणा समजून लपविण्याचा प्रयत्न करतात. आपले मुलं, किंवा जवळची व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला घेतला जात नाही. डिप्रेशन किंवा मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नव्हे. ते लपविण्यात कसलेच हित नाही. उलट आपल्या जवळच्या व्यक्तीकडे, विश्वासू व्यक्तीकडे किंवा काउन्सिलरकडे मनातल्या गोष्टी शेअर केल्यास यातून बाहेर पाडण्याचे उपाय आपल्याला मिळू शकतात. घरच्यांसोबत वेळ घालविल्यास किंवा आपल्या आवडत्या गोष्टींना वेळ दिल्यास डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत होते. त्यासाठी टोकाचे पाऊल घेण्याची गरज गरज नाही. शेवट कोणत्याच गोष्टीला नसतो, फक्त त्या गोष्टीच्या पुढे बघण्याची दृष्टी हवी. 

सध्या ट्रेंडिंग असणारा विषय म्हणजे डिप्रेशन.. डिप्रेशन म्हणजेच नैराश्य.. दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या लाइफस्टाइलमुळे आणि इतर बऱ्याच वैयक्तिक कारणांमुळे सध्याची पिढी डिप्रेशनसोबत दोन हात करताना दिसत आहे. डिप्रेशन हा एक असा आजार आहे जो लवकरात लवकर बरा होणे अत्यंत महत्त्वाचे  असते. कारण यामुळे लोकांचे होणारे नुकसान हे खूपच भयंकर ठरू शकते. इतके भयंकर की त्यात एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो.. 

हो!! तुम्ही जे वाचताय ते अगदी बरोबर आहे. सततचा कामाचा ताण, चिडचिडेपणा आणि बदललेल्या जीवनशैलीतील इतर गोष्टी यामुळे मुख्यतः तरूणांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. भारतातही डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस फार गंभीर होत चालली आहे. या समस्येवर वेळीच उपाययोजना केली नाही तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात. 

कुशल पंजाबी या टिव्ही अभिनेत्याच्या आत्महत्येने पुन्हा डिप्रेशन या विषयावर सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण पुढे आलेले नाही तरीही त्याच्या वडिलांनी व मित्रपरिवाराने तो डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले..

एखाद्या अभिनेत्याने किंवा लोकप्रिय व्यक्तीने असे डिप्रेशनच्या आहारी जाऊन स्वतःला संपविणे ही गोष्ट मनाला हुरहूर लावून जाते. जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी यांसारख्या अभिनेत्रींनी सुद्धा डिप्रेशनमुळे स्वतःचे आयुष्य संपवले होते..

खरंच डिप्रेशनमुळे माणूस इतके टोकाचे पाऊल उचलतो का? आणि उचलतही असेल तर का? आयुष्यात येणाऱ्या समस्या एवढ्या मोठ्या असतात का किंवा बिझनेसमधील अपयश माणसाला इतके मोठे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडते का? असे सर्व प्रश्न मग समाजापुढे उभे राहतात. या समस्यांवर अनेक खात्रीलायक उपाय असतात, अनेकजण ते शोधतात सुद्धा. पण काही लोक प्रयत्न न करताच हार मानतात आणि मग डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन हँडल करता न आल्याने त्यांच्यापुढे एकच शेवटचा पर्याय उरतो...  अनेक लोकप्रिय अभिनेता-अभिनेत्री, बिझनेसमन, पब्लिक फिगर यांच्यासोबतच अगदी सामान्य मनुष्य सुद्धा डिप्रेशनचे शिकार होताना दिसत आहे. यामुळेच सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर्स यांचा बिझनेस सुद्धा वाढताना दिसत आहे..

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने सुद्धा ती डिप्रेशनमध्ये होती हे सांगितले होते. त्यानंतर बी टाऊनमध्ये आणि सोबतच सर्वसामान्यांमध्ये सुद्धा डिप्रेशनविषयी चर्चा रंगल्या होत्या. नुकताच प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा चित्रपट 'जोकर' याच कारणामुळे लोकप्रिय झाला. डिप्रेशनमुळे व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो हे या चित्रपटामधून लोकांपर्यंत पोहोचले. या चित्रपटाचा खूप बोलबाला सुद्धा झाला.. गेल्या काही वर्षांपासून भारतात डिप्रेशनचे प्रमाण वाढतच चालले आहे. अनेक जण काममध्ये आलेल्या अधिक ताणतणावामुळे डिप्रेशनमध्ये जातात, तर बिझनेमध्ये येणाऱ्या अपयशामुळे किंवा बुडत जाणाऱ्या बिझनेसमुळे, तर वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या ताणतणावामुळे सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात..