याच खेळातील सुप्रसिद्ध अमेरिकन माजी बास्केटबॉलपटू म्हणजे कोबी ब्रायंट.. कोबी ब्रायंट हा जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू असल्याने त्याला कोणी ओळखत नसेल अशी व्यक्ती सापडणार नाही. त्याच्या फॅन्समध्ये तो 'ब्लॅक मम्बा' या नावाने सुद्धा ओळखला जात असे.. बास्केटबॉल सारख्या खेळामध्ये अगदी प्राविण्य मिळवून एखाद्या जादूगाराप्रमाणे तो खेळत असे. त्यामुळे त्याला बास्केटबॉलचा जादूगार म्हणणे अगदीच बरोबर ठरेल. पण याच जादूगाराचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू व्हावा याची कोणीच कल्पना केली नव्हती...
कोण होता कोबी ब्रायंट? कोबी ब्रायंट हा जगातील सुप्रसिद्ध पाच बास्केटबॉलपटूमधील एक होता, ज्याचे चाहते जगभरात आहेत. कोबी ब्रायंट याने पाच वेळा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीएचे चॅम्पियनशिप जिंकले होते. आपल्या २० वर्षाच्या करिअरमध्ये कोबीने लॉस एजल्सकडून खेळला... २० वर्षाच्या करिअरमध्ये कोबीने पाच वेळा एनबीए चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. कोबीने १८ वेळा एनबीएचा 'ऑल स्टार' हा किताब मिळवला होता. तर २००८ मध्ये एनबीएचा सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले होते... त्याने एनबीए फायनलमध्ये 'एमव्हीपी' हा किताब दोन वेळा मिळवला होता. २००८ बिजिंग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने त्याच्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. २००६ मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात ८१ गुण मिळवून त्याच्या करिअरमध्ये सर्वोत्तम खेळी खेळली होती... कोबीने २०१५ मध्ये त्याच्या बास्केटबॉलच्या प्रेमाखातीर एक प्रेम पत्र लिहले होते. या प्रेम पत्रावरून 'डिअर बास्केटबॉल' हा एक शॉर्ट अॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला होता... कसा झाला मृत्यू... मृत्यू कधीही सांगून येत नाही.. मग तुम्ही कोणीही असाल.. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे २६ जानेवारी २०२० रोजी एक हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातामुळे संपूर्ण जग हेलावून गेले होते. कारण या अपघातापेक्षाही भयानक बातमी कोबीच्या चाहत्यांना मिळाली होती... या अपघातात कोबीचा मृत्यू झाला. सोबतच त्याची १३ वर्षीय मुलगी गियेनाचाही मृत्यू झाला. गियेना देखील एक बास्केटबॉलपटू होती. या दोघांच्याही मृत्यूमुळे संपूर्ण जग हळहळले. एखाद्याचा इतका दुःखद मृत्यू व्हावा याची कल्पना कोणीही नसेल केली.. बास्केटबॉलचा हा जादूगार जरीही आपल्यातून निघून गेला असेल तरी त्याची जादू काही कमी होणार नाही हे त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला विविध पद्धतीने श्रद्धांजली वाहून दाखवून दिले.
जागतिक क्रीडा क्षेत्रात अनेक खेळ प्रसिद्ध आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्या खेळांना आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅटमिंटन अशा अनेक खेळांना जभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो. पण एक असा खेळ ज्या खेळाचे चाहते जगभरात तुम्हाला पाहायला मिळतील तो खेळ म्हणजे बास्केटबॉल...
याच खेळातील सुप्रसिद्ध अमेरिकन माजी बास्केटबॉलपटू म्हणजे कोबी ब्रायंट.. कोबी ब्रायंट हा जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू असल्याने त्याला कोणी ओळखत नसेल अशी व्यक्ती सापडणार नाही. त्याच्या फॅन्समध्ये तो 'ब्लॅक मम्बा' या नावाने सुद्धा ओळखला जात असे.. बास्केटबॉल सारख्या खेळामध्ये अगदी प्राविण्य मिळवून एखाद्या जादूगाराप्रमाणे तो खेळत असे. त्यामुळे त्याला बास्केटबॉलचा जादूगार म्हणणे अगदीच बरोबर ठरेल. पण याच जादूगाराचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू व्हावा याची कोणीच कल्पना केली नव्हती...
कोण होता कोबी ब्रायंट? कोबी ब्रायंट हा जगातील सुप्रसिद्ध पाच बास्केटबॉलपटूमधील एक होता, ज्याचे चाहते जगभरात आहेत. कोबी ब्रायंट याने पाच वेळा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीएचे चॅम्पियनशिप जिंकले होते. आपल्या २० वर्षाच्या करिअरमध्ये कोबीने लॉस एजल्सकडून खेळला... २० वर्षाच्या करिअरमध्ये कोबीने पाच वेळा एनबीए चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. कोबीने १८ वेळा एनबीएचा 'ऑल स्टार' हा किताब मिळवला होता. तर २००८ मध्ये एनबीएचा सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले होते... त्याने एनबीए फायनलमध्ये 'एमव्हीपी' हा किताब दोन वेळा मिळवला होता. २००८ बिजिंग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने त्याच्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. २००६ मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात ८१ गुण मिळवून त्याच्या करिअरमध्ये सर्वोत्तम खेळी खेळली होती... कोबीने २०१५ मध्ये त्याच्या बास्केटबॉलच्या प्रेमाखातीर एक प्रेम पत्र लिहले होते. या प्रेम पत्रावरून 'डिअर बास्केटबॉल' हा एक शॉर्ट अॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला होता...
कसा झाला मृत्यू... मृत्यू कधीही सांगून येत नाही.. मग तुम्ही कोणीही असाल.. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे २६ जानेवारी २०२० रोजी एक हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातामुळे संपूर्ण जग हेलावून गेले होते. कारण या अपघातापेक्षाही भयानक बातमी कोबीच्या चाहत्यांना मिळाली होती... या अपघातात कोबीचा मृत्यू झाला. सोबतच त्याची १३ वर्षीय मुलगी गियेनाचाही मृत्यू झाला. गियेना देखील एक बास्केटबॉलपटू होती. या दोघांच्याही मृत्यूमुळे संपूर्ण जग हळहळले. एखाद्याचा इतका दुःखद मृत्यू व्हावा याची कल्पना कोणीही नसेल केली.. बास्केटबॉलचा हा जादूगार जरीही आपल्यातून निघून गेला असेल तरी त्याची जादू काही कमी होणार नाही हे त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला विविध पद्धतीने श्रद्धांजली वाहून दाखवून दिले.