Blog-Image

तुम्ही डिझ्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर वेब सिरीज किंवा सिनेमे पाहता का? तसं पहायला गेलं तर 2015 पासूनच OTT प्लॅटफॉर्म तरुणाईमध्ये प्रचलित होऊ लागला होतं. वेगवेगळे शोज आणि वेबसिरिजनी तरुणांच्या मनाचा ठाव घेतला

तुम्ही डिझ्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर वेब सिरीज किंवा सिनेमे पाहता का? तसं पहायला गेलं तर 2015 पासूनच OTT प्लॅटफॉर्म तरुणाईमध्ये प्रचलित होऊ लागला होतं. वेगवेगळे शोज आणि वेबसिरिजनी तरुणांच्या मनाचा ठाव घेतला. त्यातच लॉकडाऊनमुळे OTT प्लॅटफॉर्म भलताच फॉर्ममध्ये आला. मनोरंजन विश्वाचा तो खूप मोठा हिस्सा बनला आहे. दोन प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म असतात. एक म्हणजे सबस्क्रिप्शन बेस आणि दुसरं फ्री सर्व्हिस.

जवळपास वर्षभर थिएटर्स बंद होते त्यामुळे तरुणांची सिनेमांची भूक भागवण्याचं काम OTT प्लॅटफॉर्म ने केलं. आता बघता बघता OTT प्लॅटफॉर्म्सचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अब्जावधींची उलाढाल या माध्यमातून होते. OTT प्लॅटफॉर्मचं बिझनेस मॉडेल काय आहे हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE अँप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा... OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय?

OTT म्हणजे Over The Top प्लॅटफॉर्म. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल ॲप्सच्याद्वारे टेलिव्हिजन तसंच फिल्म्सचा कंटेंट पुरवला जातो. आणि आपलाच कंटेंट किंवा आपलेच शोज कसे ऑव्हर द टॉप राहतील म्हणजेच सर्वाधिक पसंती मिळवतील याची काळजी घेतली जाते. सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅटफॉर्म्समध्ये जबरदस्त कॉम्पीटीशन सुरू आहे. 2008 मध्ये रिलायन्सने बिग फ्लिक्स नावाची (BIGFlix) भारतातली पहिली OTT सर्व्हिस सुरू केली होती. 2015 मध्ये Hotstar सुरू झाल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मला मोठी गती मिळाली. मधल्या काळात सोनी लिव्ह, डिट्टो टीव्ही अशा काही सर्व्हिस सुरू झाल्या होत्या, पण त्यांना फारसा रिस्पॉन्स मिळाला नव्हता. सध्या भारतात Hotstar, eros now, Netflix, amazone prime video, mx player, jio tv, voot, soni liv, zee5, alt balaji, airtel tv premium असे अनेक प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. Hotstar, Netflix, amazone prime video हे काही प्रसिद्ध प्लॅटफॉर्म्स आहेत.

स्वस्त आणि मस्त मुव्ही पहायला थिएटरमध्ये जायचं म्हणजे प्रत्येकी कमीत कमी 300 रु. तिकिट असतं. त्यात तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च, बाहेर खाण्याचा खर्च आणि त्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन जात असाल, तर हा खर्च 2000 पर्यंत जातोच. पण, OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जास्तीत जास्त 1500 रुपयांमध्ये वर्षभराचं सबस्क्रिप्शन मिळतं. 300 रुपयांपर्यंत तुम्हाला महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळतं.

यामध्ये तुम्हाला टीव्ही शोज, फिल्म्स, वेबसिरिज, साँग्स, क्रिकेट मॅच हे सगळं वर्षभर बघता येणार आहे. त्यामुळे कमी वेळात ऑनलाईन स्क्रिमींगचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.बॉलिवूड स्टार्सची OTT प्लॅटफॉर्म्सला पसंती सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा सिनेमा डिझ्नी हॉटस्टार वर रिलिज केला होता आणि ऐन लॉकडाऊन मध्ये रिलिज झालेल्या या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला होता

त्यानंतर शकुंतला देवी हा विद्या बालन, लक्ष्मी बॉम्ब हा अक्षय कुमारचा सिनेमा सुद्धा कोव्हिडमुळे डिझ्नी हॉटस्टारवर रिलिज करावा लागला होता. 2021 मध्ये प्रियांका चोप्रा, अजय देवगन, संजय दत्त, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, इलियाना डिक्रुझ, काजोल, मनोज वाजपयी, पूजा भट अशा बड्याबड्या बॉलिवूड स्टार्सचे सिनेमे, वेबसिरिज OTT प्लॅटफॉर्म वर रिलिज होणार आहेत.

OTT प्लॅटफॉर्म्सना सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्याचे राईट्स निर्मात्याकडून विकत घ्यावे लागतात. तर काही वेळा OTT प्लॅटफॉर्म्स स्वतः सिनेमांची निर्मिती करतात. अशा वेळी OTT प्लॅटफॉर्म्स फिल्ममेकरला ठराविक अमाउंट देतात. त्या अमाउंट पेक्षा कमी पैसे खर्च करून फिल्ममेकर सिनेमा बनवून त्यांचा प्रॉफिट काढतात.

आता हे OTT प्लॅटफॉर्म पैसे कसे कमवतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, एक म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही कंटेंट या ॲप्समधून डाऊनलोड करता तेव्हा त्यांना एक फी आकारली जाते. दुसरं म्हणजे तुम्ही शो पहात असताना ॲड्स प्ले होतात, त्यांच्या थ्रू त्यांना पैसे मिळतात. तिसरं म्हणजे ग्राहक त्यांची महिन्याची किंवा वर्षाची सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेतात, त्यामाध्यमातून त्यांना पैसे मिळतात.