Blog-Image

झगमगत्या दुनियेतून बाहेर पडून नवीन क्षेत्रात पाय ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही. दहा वर्षात मिळवलेली प्रसिद्धी, ग्लॅमर, पैसा सर्व काही मागे सारून मयुरी यांना नव्याने सुरुवात करायची होती. पुढे त्या एम. बी. ए. करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेल्या. परंतु, कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा अनुभव नसल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी पडत होता. कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा अनुभव नसल्याने त्यांनी इंटरर्नशिप्स केल्या. या कामाच्या अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास बळावला. जिथे त्यांनी इंटर्नशिप केली होती त्याच कंपनीने त्यांना ॲडव्हर्टायझींग क्षेत्रात पहिल्या नोकरीची संधी दिली. तेव्हापासून आजतागायत त्या डिजिटल, मार्केट रिसर्च, ॲडव्हर्टायझींग क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत आहेत. 

लहानपणापासूनच त्यांना एखाद्या कंपनीचा सीईओ होण्याची इच्छा होती. 2012 ला त्या न्यूयॉर्कमधून भारतात परत आल्या. त्यानंतर गुगलमध्ये काम सुरू करण्यापूर्वी त्या एका कंपनीच्या सीईओ होत्या. यावेळी खऱ्या अर्थाने त्या आपलं स्वप्न जगत होत्या. 6 वर्ष त्या कंपनीसाठी काम केल्यानंतर त्या नव्या संधीच्या शोधात होत्या. यावेळीच त्यांना गुगलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये त्या गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड पदावर विराजमान झाल्या असून यशस्वीरित्या आपली जबाबदारी पार पाडत आहेत. गुगल ही अमेरिकेतील जगप्रसिद्ध मल्टीनॅशनल टेक्लॉलॉजी कंपनी आहे. या कंपनीच्या प्रमुखपदी महाराष्ट्रीय तरुणी विराजमान असणं ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ते गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड – मराठमोळ्या मयुरी कांगो यांचा रंजक प्रवास  कधी काळी बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलेल्या मयुरी कांगो या 2019 पासून गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहेत. औरंगाबादमध्ये महाराष्ट्रीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या जिज्ञासू वृत्तीच्या मयुरी यांचं मन बॉलिवूडमध्ये जास्त काळ रमलं नाही. 12 वीत असताना त्यांनी बॉलिवूडमध्ये पहिला सिनेमा केला. 1995 ते 2005 या 10 वर्षांत त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच, टिव्ही मालिकांमधूनही त्यांनी काम केलं आहे. खासकरून टिव्ही मालिकांतून काम करत असताना त्यांना जाणीव झाली की त्या फार काळ या क्षेत्रात तग धरून राहू शकणार नाहीत. त्यांना काहीतरी नवीन शिकायचं होतं. त्या जे काम करत होत्या त्यातून त्यांना कामाचा आनंद मिळत नव्हता. शिवाय त्या काळात महिलांना ताकदीच्या भूमिका करायला मिळत नव्हत्या. अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी एम. ए. पर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी तसेच आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी त्यांनी अखेर अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. 