Blog-Image

गरजेखातीर महेश यांनी एका उत्तम आविष्काराला जन्म दिला आणि आज त्यांचा हा अविष्कार भारतात प्रत्येक घरात दिसून येतो. पण याच आविष्काराला का जन्म दिला गेला त्यामागील महेश यांची गोष्ट खूपच दुःखद आहे. केंट आरो कंपनीचे संस्थापक महेश गुप्ता यांच्यासाठी 1998 हे वर्ष अत्यंत वाईट होते. कारण यावर्षी महेश यांची दोन मुले अशुद्ध पाण्यामुळे आजारी पडली आणि आजारपणातच त्या दोघांचेही निधन झाले... आपल्या मुलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर महेश यांना वॉटर प्युरिफायर आणि शुद्ध पाण्याचे महत्त्व समजले. त्यावेळी बाजारात वॉटर प्युरिफायर उपलब्ध होते. पण त्यांची गुणवत्ता समाधानकारक नव्हती. म्हणजे ते प्युरिफायर पाणी पूर्णपणे शुद्ध करत नसत. त्यामुळे महेश यांनी यासाठी काम करण्याचे ठरवले आणि अशीच केंट आरोची कल्पना उदयास आली. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या महेश यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्यांची कल्पना यशस्वी केली.. 

त्यावेळी बाजारात उपलब्ध असणारे वॉटर प्युरिफायर्स अल्ट्रावायलेट तंत्रावर काम करणारे असल्यामुळे पाण्यामध्ये विरघळलेली घाण साफ करण्यास सक्षम नव्हते. महेश यांना माहित होते की भारतातील बरेच आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होतात. त्यामुळे याच वेळेस त्यांनी रिवर्स ऑस्मोसिसची सुरुवात केली. महेश यांनी केवळ 5 लाख रुपयांनी आपला व्यवसाय सुरू केला. जागा आणि पैशाअभावी त्यांनी सुरुवातीला छोट्या गॅरेजमध्ये त्यांची कंपनी सुरू केली...  सुरुवातीच्या वर्षात, त्यांची कंपनी केवळ 100 प्युरिफायरची विक्री करण्यास सक्षम होती. त्यावेळी त्याची किंमत 20 हजार रुपये होती, तर उर्वरित कंपन्यांचे प्युरिफायर्स 5000 रुपये किंमतीच्या आसपास विक्री करीत होते.पण असे म्हणतात की परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. 2016-17 मध्ये कंपनीचा टर्नओव्हर 850 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 2017-18 मध्ये याच टर्नओव्हरने 950 कोटींचा टप्पा ओलांडला..

Bureau Of Indian Standards ने केंट आरोच्या क्रांतिकारी मिनरल आरो टेक्नॉलॉजीला ISI प्रमाणपत्र प्रदान करून गौरव केला. आरो प्युरिफायरच्या क्षेत्रात केंट आरो हा असा पहिला वॉटर प्युरिफायर ब्रँड बनला आहे ज्याला ISI प्रमाणपत्र मिळाले आहे. 950 कोटींचा टप्पा पार करत आता पुढील वर्षात  टर्नओव्हर 1000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. 

गरज ही आविष्काराची जननी आहे असे म्हंटले जाते. अशाच गरजेमुळे एका आवश्यक अशा आविष्काराची निर्मिती झाली..  आपल्यापकी बरेच जण महेश गुप्ता यांना ओळखत नसतील, पण त्यांच्या प्यायचे शुद्ध पाणी देणाऱ्या 'केंट आरो' या कंपनी तर सर्वांच्याच ओळखीची आहे... 

भारतातील प्यायचे पाणी शुद्ध करणाऱ्या पहिल्या क्रमांकावरील कंपनीचे नाव म्हणजे 'केंट आरो' हेच घेतले जाते. महेश गुप्ता हे या नावाजलेल्या 'केंट आरो' कंपनीचे संस्थापक आहेत.. त्यांनी केंट आरो ही कंपनी सुरु करण्यामागे त्यांच्या आयुष्यात घडलेली एक हृदयद्रावक घटना आहे. या घटनेमुळेच महेश हे आज इतकी मोठी कंपनी प्रस्थापित करु शकले... 