जगभरातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमधून जगभरातील क्रिकेटर्स बक्कळ पैसा कमावतात. लिलावाच्या माध्यमातून क्रिकेटर्सना पैसा मिळतो. पण फक्त फ्रॅन्चायसीकडूनच आयपीएल आणि खेळाडूंना पैसा मिळतो असं नाही. आयपीएलला पैसा मिळण्याचे अनेक माध्यमं आहेत. या विविध माध्यमातून आयएलची अगणित कमाई होते. आयपीएलचं हे अर्थकारण नक्की कसं आहे ते जाणून घेऊया. बीसीसीआयने जारी केलेल्या २०१५ च्या आकडेवारीनुसार आयपीएलने जवळपास ११५० कोटींची कमाई केली जी भारताच्या एकूण जीडीपीच्या जवळपास जाणारी होती. जाहिराती, स्पॉन्सर्स, ब्रॉडकास्टिंग, मर्चंडाईज आदी विविध माध्यमातून आयपीएलला कमाई होत असली तरीही बीसीसीआय आयपीएलच्या माध्यमातून मिळणार्या कमाईवर एक रुपयाही टॅक्स भरत नाही.
आयपीएलला सर्वात जास्त निधी मिळतो तो ब्रॉडकास्टिंगकडून. सध्या आयपीएलचे ओटीटीवर ऑनलाईन स्ट्रिमिंगही केले जाते. ज्या चॅनेलवर ही मॅच दाखवली जाते त्या चॅनेलकडून आयपीएल आयोजकांना मोठी रक्कम मिळते. आयपीएलची सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजेच २००८ ते २०१७ काळात सोनी वाहिनीने बीसीसीआयला जवळपास ८ हजार कोटी रुपये ब्रॉडकास्टसाठी दिले. तर, स्टार स्पोर्ट्सने फक्त ५ वर्षांसाठी १६ हजार ३७० कोटींची ब्रॉडकास्टिंगसाठी ऑफर दिली. म्हणजेच सोनीपेक्षा चौपट पैसे स्टार स्पोर्ट्सने दिले. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षाच्या आयपीएलच्या ऑनलाईन स्ट्रिमिंगसाठी जेफ बेझॉस आणि मुकेश अंबानी 50,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत.