परंतु स्नेहलनीतीने आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे की मराठी माणूस खूप उत्तम व्यवसाय करू शकतो. प्रशिक्षण आणि कार्यशाळा या माध्यमातून श्री. स्नेहल कांबळे यांनी आतापर्यंत कितीतरी उद्योजकांना प्रेरित करून त्यांच्या व्यवसायाला एक दिशा दिली आहे.त्यांनी आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा बिजनेस वाढवला आहे. स्नेहलनीतीच्या कार्यशाळा मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतात. अशाप्रकारे त्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील बरेचसे व्यवसाय हे 10X पटींनी वाढले आहेत.


श्री.स्नेहल सरांचे एक ध्येय आहे, ते म्हणतात -

" दुकानाच्या पाट्या मराठीत झाल्या पाहिजेतच आणि त्याबरोबरच दुकानातील व्यापारी सुद्धा मराठी असला पाहिजे ..."

आपल्या मराठी माणसाने जास्तीत जास्त उद्योग क्षेत्रामध्ये आपली प्रगती करावी आणि यश संपादन करावे, यासाठी ते दहा वर्षांपासून झटत आहेत.

श्री. स्नेहल कांबळे

एका साधारण मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या 'स्नेहल कांबळे' यांनी मोठ्या कष्टाने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.पुढे आभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करीत आपला सर्वांगीण विकास साधला.नोकरीत मन रमेना म्हणून आपल्या अंतर्गत उपजत असलेल्या उत्तम वक्तृत्त्वावर त्यांनी बिझनेस कोचिंग सुरू केले. त्यानंतर 'उद्योगनीती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' या कंपनीची स्थापना करून स्वतःचा 'स्नेहलनीती' हा ब्रँड विकसित केला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 लाखांहून अधिक मराठी आणि अमराठी उद्योजकांना सेमिनार आणि सेशन्सद्वारे मार्गदर्शन केले असून कित्येकांचे बिजनेस 1 करोड ते 2000 करोडपर्यंत वाढवले आहेत.

स्नेहलनीती यूट्युब चॅनेल आणि फेसबुकला लाखो फॉलोवर्स जोडले गेले आहेत आणि करोडो व्हिडीओ व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच त्यांनी राज्यभर 10 लाखांहून अधिक लोकांशी संवाद साधला आहे आणि यापुढेही ते आपले बिजनेस ट्रेनिंगचे कार्य सुरुच ठेवणार आहेत. श्री. स्नेहल कांबळे हे मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे धडे गिरवायला शिकवणारे भारताचे नं. 1 बिझनेस कोच असून ते एक लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकरदेखील आहेत.

snehal-kamble-images
10+

Years Experience